प्र.खालील उतारा वाचून त्याचा सारांश लिहा व योग्य शीर्षक लिहा.
तो सूर्य पहा, त्याचे दर्शन म्हणजे परमात्म्याचे दर्शन.तो नाना प्रकारची चित्रे आकाशात रंगवीत असतो. चित्रकार महिनेच्या महिने कुंचले मारून सूर्योदयाची चित्रे रंगवितात. सकाळी उठून जरा पहा परमेश्वराची कला. त्या दिव्य कलेला, त्या अनंत सौंदर्याला उपमा तरी देता येईल कां? पण पाहतो कोण ? तिकडे तो सुंदर भगवान उभा राहून म्हणतो,"आळश्या तू निजू पाहशील, परंतु मी तुला उठवणार आहे."स्थावर जंगमाचा सूर्य हा आत्मा आहे. हा मित्र लोकांना हाका मारतो. त्यांना काम करायला लावतो. त्याने स्वर्गपृथ्वीचे रूप धारण केले आहे. खरोखरच तो सूर्य जीवनाचा आधार आहे. त्याच्या ठिकाणी परमात्मा पाहा.
Answers
Answered by
2
Answer:
सूर्याचे दर्शन म्हणजे परमात्म्याचे दर्शन. सकाळी उठून परमेश्वराची कला पहावी. या निसर्गाच्या दिव्या कलेला उपमा देता येणार नाही. पण त्या कलेला कोणीच बघत नसल्याने देवच उभा राहून आपल्याला झोपलेले बघून उठवतो. स्थावर जंगमाचा सूर्य हा आत्मा आहे. हा मित्र लोकांना हाका मारून त्यांचं काम करायला लावतो. त्याने स्वर्गपृथ्वीचे रूप धारण केले असून तो खरंच जीवनाचा आधार आहे.
Similar questions
Social Sciences,
3 months ago
Math,
3 months ago
Math,
6 months ago
English,
6 months ago
Hindi,
1 year ago