प्र. ४ : खालील व्याकरण आधारीत कृती पूर्ण करा. १) खालील वाक्यातील उभयान्वयी अव्यये शोधून लिहा.
१. तो घरी गेला पण घर बंद होते.
Answers
Answer:
यांचे पुढील 4 प्रकार पडतात.
1. समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय –
दोन प्रधान किंवा मुख्य वाक्ये व, अन्, शिवाय यांसारख्या उभयान्वयी अव्ययांनी जोडून त्याचा मिलाफ किंवा समुच्चय करतात अशा उभयान्वयी अव्ययांना समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात.
उदा. व, अन्, आणि आणखी, न, शि, शिवाय,
पाहुणे आले आणि लाईट गेली.
राम शाळेत जाण्यासाठी निघाला व पाऊस आला.
आज डब्यात भाजी, पोळी आणली अन् लोनचे पण आहे.
चिमणीने घरट्याबाहेर मान काढली व किलबिलाट केला.
2. विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय –
जेव्हा वाक्यांना जोडणारी अथवा, वा, की, किंवा, ही उभयान्वयी अव्यये दोन किंवा अनेक गोष्टींपैकी एकाची अपेक्षा दर्शवितात म्हणजेच हे किंवा ते किंवा त्यापैकी एक असा अर्थ सूचित करतात अशा अव्ययांना विकल्प बोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात.
उदा. अथवा, वा, की, किंवा, अगर इत्यादी.
तुला चहा हवा की कॉफी ?
करा किंवा मरा.
सिनेमाला येतोस की, घरी जातोस ?
3. न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय –
जेव्हा दोन वाक्यांना जोडणारी पण, परंतु, परी, बाकी, ही अव्यये पहिल्या वाक्यामध्ये काही उणीव, कमी, दोष असल्याचा आशय किंवा भाव व्यक्त करतात अशा अव्ययांना न्यूनत्व बोधक उभयन्वयी अव्यये असे म्हणतात.
उदा. परंतु, पण, बाकी, किंतु, परी इत्यादी.
मरावे, परी किर्तीरूपी उरावे.
लग्न छान झाले पण जेवण बरोबर नव्हते.
त्याने अभ्यास केला, परंतु नापास झाला.
4. परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय –
जेव्हा दोन वाक्यांना जोडणार्या उभयान्वयी अव्ययामुळे घडलेल्या एका वाक्यात घडलेल्या घटनेचा परिणाम पुढील वाक्यावर झाल्याचा बोध होत असेल तर अशी वाक्य जोडणार्या अव्ययांना परिणामबोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात.
उदा. म्हणून, याकरिता, सबब, यास्वत, तेव्हा, तस्मात इत्यादी.
राधाने मनापासून अभ्यास केला; म्हणून ती पास झाली.
गाड्या उशीराने धावत आहे; सबब मला उशीर झाला.
तुम्ही त्याचा अपमान केला याकरिता तो येत नाही.
मला बरे नाहीह म्हणून ती शाळेत जाणार नाही.
Explanation: