India Languages, asked by anitatayade877954652, 2 months ago

प्र.३.खाली दिलेल्या शब्दांच्या आधारे कथा लिहा. कथेला शीर्षक दया.
(शेत-शिकारी-जाळे. पक्षी)​

Answers

Answered by mad210216
15

"शिकारी आणि पक्षी"

Explanation:

  • एक दिवशी एका जंगलात एक शिकारी आला होता. त्याला पक्ष्यांचे शिकार करायचे होते. म्हणून त्याने पक्षींना अडकवण्यासाठी जमिनीवर जाळे टाकले आणि त्यावर धान्य पसरवले.
  • काही वेळाने, त्या जाळ्यावरून काही पक्षी उडत जात होते. त्यांनी जमिनीवर धान्य पाहिले आणि ते खाण्यासाठी ते खाली उतरले.
  • पक्ष्यांनी धान्य खायची सुरुवात केली, परंतु त्यांचे पाय जाळ्यात अडकले. तेव्हा, पक्षी खूप घाबरले. त्यांनी जाळ्यातून निघायचे खूप प्रयत्न केले परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही.
  • त्यांच्यातील एक पक्षी हुशार होता. त्याने सगळ्या पक्ष्यांना एकत्र ताकदीने उडण्याचा सल्ला दिला. त्याच्या सल्ल्यानुसार सगळे पक्षी एकाच वेळी आकाशात उडाले आणि त्यांची शिकाऱ्यापासून सुटका झाली.
  • तात्पर्य : ऐक्य मध्येच शक्ति असते म्हणून नेहमी एकमेकांना साथ देऊन काम करावे.
Similar questions