World Languages, asked by taiseenshaikh14, 2 months ago

प्र. खाली दिलेल्या विषयांपैकी कोणत्याही एका विषयावर 150 ते 200 शब्दांत निबंध
लिहा.
(8)
1) परीक्षा नसत्या तर
मुददेः एक मजेदार कल्पना
परीक्षांचे विविध प्रकार परीक्षामुळे
विदयार्थ्यावर येणारी बंधने परीक्षा नसल्यामुळे होणारा आनंद. फायदे
परीक्षाची आवश्यकता​

Answers

Answered by namdevgarje0gmailcom
1

Answer:

खरेच! परीक्षा नसत्या तर मुलांना सतत अभ्यासात बुडून जावे लागले नसते. आज काय आठवड्याची परीक्षा, मग मासिक परीक्षा, मग चाचणी, मग सहामाही, नंतर नऊमाही व शेवटी वार्षिक. अशा सतत परीक्षा चालू असतात. अन् मुलांना सतत मान मोडून अभ्यासात गर्क राहावे लागते. कारण परीक्षेत कमी गुण मिळाले तरी सरासरी गुण कमी होणार. अन् हल्ली तर एकाएका मार्काने नंबर मागे जात असतो. या अशा अतिशय स्पर्धेचा, मुलांच्या मनावर भयंकर ताण येतो. शिवाय मुले मग परीक्षार्थीच बनतात.

परीक्षेत कोणते प्रश्न येतील, परीक्षेसाठी काय विचारतील तेवढेच शिकायचे अशी त्यांची वृत्ती बनते आणि विषय खरोखर समजून घेणे, खोलात जाऊन अभ्यास करणे हे घडतच नाही. तसेच फक्त परीक्षेला महत्त्व असल्याने मुले नुसते पाठ करून येतात व परीक्षेत लिहितात, म्हणजे तो विषय त्यांना नीट कळला व मग ती मुले तसे लिहिणार असे होत नाही. जाऊ दे झाले!

परीक्षा म्हटले की मुलांच्या पोटात भीतीचा गोळा येतो. रात्री जागा! पहाटे उठा! एवढे करूनही काही वेळा शेवटी डोक्यात कोंबलेल्या साऱ्या अभ्यासातील परीक्षेच्या वेळी काहीच आठवत नाही. आजकाल १० वी, १२ वी च्या परीक्षांना इतके महत्त्व प्राप्त झाले आहे की विद्यार्थी बिचारे वर्षभर मान मोडून, दिवसरात्र मेहनत घेऊन अभ्यास करीत राहतात. त्या वर्षात मुलाला दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचा विचार करता येत नाही. सतत अभ्यास! अभ्यास! अभ्यास! बरे, एवढे करूनही अपेक्षित मार्कस् मिळतीलच असे नाही.

Similar questions