प्र.४. मागील १० वर्षांत भारतात झालेल्या भूकंपाची माहिती (१) दिनांक (२) वेळ (३) तीव्रता (रिश्टरमध्ये) ()
(मीटरमध्ये) (६) प्रभावित क्षेत्र आणि (७) झालेली हानी या मुद्द्यांच्या आधारे आंतरजालाच्या मदतीने मिळत
तक्त्यात भरा व या माहितीच्या आधारे तुमचे निष्कर्ष लिहा : मराठी
Answers
Answer:
आपल्या देशात आलेल्या मोठ्या भूकंपांबद्दल…
१. भारतातल्या हिंदी महासागरात झालेला मोठा भूकंप-
वेळ होती सकाळी ८ वाजून ५५ मिनिटे, तारीख- २६ डिसेंबर २००४, हा भूकंप होता ९-१ रिष्टर स्केल चा.
भारतासह श्रीलंका, थायलंड, मालदीव बेटे, सोमालिया, आशा मोठ्या परिसरात ह्या भूकंपाचे हादरे बसले आणि सुनामी संकट कोसळले, सगळ्या परिसरात प्रचंड पाण्याच्या लाटा घुसल्या, धरणीचा सगळ्यात मोठा थरकाप झाला.
अनेक घरे, इमारती कोसळल्या, रस्ते उध्वस्त झाले. झाडे उन्मळून पडली, मोठे पूल कोसळले आणि अनेक लोक मृत्यूमुखी पडले. ह्या चारही देशात हाहाक्कार झाला, एकूण २,८३,१०६ माणसे मरण पावली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हानी झाली. लोक बेघर झाले. अनेक लोक जखमी झाले, अनेक लोकांची ताटातूट झाली. त्यांची परत कधी भेट झालीच नाही.
साऱ्या जगाला ही आपत्ती आपलं रूप एकदा तरी दाखवून गेली आहे आणि लोकांनी ह्या आपत्तीचा दणका अनुभवला आहे. म्हणून कायमचीच भीती निर्माण झाली आहे. आपल्याला शिकवल्या जाणाऱ्या इतिहासात हिचे रौद्र स्वरूप पाहायला मिळाले आहे. अनेक शहरे ह्या आपत्तीने जमीनदोस्त केली आहेत. काही शहरे पूर्णपणे गाडली गेली आहेत.
अशी ही महा भयंकर आपत्ती म्हणून आपल्या परिचयाची आहे. माणूस आयुष्यात एकदातरी ह्या अपत्तीबद्दल ऐकतो, स्वतः अनुभवतो. ज्या भागात ही येते तिथे प्रचंड नुकसान, मनुष्य हानी, संपत्तीची हानी करून जाते.
असे भूकंप आपल्या देशातल्या अनेक ठिकाणी अनेक वेळा झालेले आहेत. आणि खूप मोठी हानी, झालेली आहे. अशा विध्वंसक १० भूकंपांची ही माहिती… ज्या भयानक धक्क्यातून लोक अजूनही सावरलेले नाहीत. घरदार उध्वस्त झाले, नाती तुटली, होते नव्हते ते पार नष्ट झाले.
ह्या भूकंपाचा केंद्र बिंदू होता सुमात्रा आणि इंडोनेशिया बेटांवर. प्रचंड हानी करणारा हा प्रचंड मोठा भूकंप. अजूनही लोक ह्यातून सावरले नाहीत.
निसर्गाच्या ह्या कोपाची अजूनही लोकांमध्ये भीती आहे. त्या आठवणीनेही लोकांच्या अंगावर काटा उभा राहतो जे ह्या भूकंपाचे साक्षीदार होते.
२. दुसरा मोठा भूकंप होता काश्मीरमधला, ८ ऑक्टोबर २००५ ह्या दिवशी सकाळी सकाळीच म्हणजे ८ वाजून ५० मिनिटे ही वेळ पुन्हा एकदा प्रचंड विध्वंसाची.
ह्या भूकंपाचे केंद्रस्थान होते पाकिस्तानातले मुझफ्फराबाद. ह्या भूकंपाने काश्मीर, पाक व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातले मुझफ्फराबाद इथे प्रचंड मोठे धक्के बसले आणि त्या संपूर्ण भागाची खूप मोठी हानी झाली. दोन्ही देशांत मिळून १,३०,००० माणसे मृत्युमुखी पडली.
अनेक इमारती पडल्या, त्यात असंख्य माणसे जखमी झाली. रस्ते उखडले गेले. जमिनीला मोठ्या भेगा पडल्यागेल्या. अशी मोठी हानी झाली. तोही भूकंप प्रचंड मोठा म्हणून लक्षात राहतो.
त्या भूकंपाची तीव्रता ७.६ रिष्टर स्केल होती त्यामुळे एवढी मोठी मनुष्य हानी झाली.
३. तिसरा मोठा भूकंप बिहार आणि नेपाळ ह्या दोन्ही भू-भागांवर झाला. १५ जानेवारी १९३४ साली हा भूकंप झाला दुपारी २:१३ वाजता.
ह्या भूकंपात बिहार आणि नेपाळ भागातली ३०००० माणसे मृत्यू मुखी पडली. ह्या भूकंपाची तीव्रता ८:७ रिष्टर स्केल इतकी मोठी होती.
४. गुजरात राज्यानेही अनेक भूकंप पाहिले, त्यातला कच्छ भुज इथला हा भूकंप.
सकाळी ८ वाजून ५० मिनिटांनी हा भूकंप झाला आणि तो दिवस होता २६ जानेवारी २००१. सात पूर्णांक सात दशांश रिष्टर स्केलचा हा प्रचंड मोठा भूकंप होता. ह्याचे हादरे महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी जाणवले, घरे हादरली.
रस्त्यावरून पायी चालणाऱ्या लोकांना हे हादरे चांगलेच लक्षात राहतील असे होते, जमीन कशी कंप पावते हे सगळ्यांना जाणवले. जमिनीचा थरथराट हा चालणाऱ्या माणसाच्या डोक्यापर्यंत झिणझिण्या आणत होता, नक्की काय होतं आहे हे कोणालाच कळत नव्हते.
चक्कर आल्यासारखे वाटत होते, चालणारा माणूस पुढे जायचा क्षणभर विसरूनच गेला होता.
तो दिवस गणराज्य दिन म्हणून संपूर्ण देशात साजरा होत होता आणि भूकंपाची वेळही सकाळचीच होती. गुजरात आणि महाराष्ट्रात लोक ध्वजारोहणाच्या तयारीत होते. कोणी ध्वजाला सलामी देत होते, कोणी छोटे झेंडे आपल्या शर्टवर लावत होते. काही सुट्टी म्हणून झेंडावंदन झाल्यावर कुठे जायचे ह्याचे प्लॅनिंग करत होते, तर काही आळशी लोक बिछान्यावर लोळत घोरत होते आणि अचानक भूकंप झाला.
गुजरात मधल्या केंद्रस्थानांची खूप मोठी हानी झाली. सगळी घरे जमीनदोस्त झाली. असंख्य लोक मारले गेले. २०,००० च्यावर लोकांचे बळी गेले. कच्छ- भुजमधले बहुतेक लोक बेघर झाले.
अन्न पाण्याचा मोठा तुटवडा निर्माण झाला, अनेक जवान, सामाजिक कार्यकर्ते, गरीब श्रीमंत सगळे मदतीला धावले. देशातून आणि परदेशातूनही मदतीचे ओघ सुरू झाले कारण खूप मोठ्या प्रमाणावर घरे, इमारती उध्वस्त झाल्या होत्या.
जिकडे तिकडे हाहाक्कार उडाला होता, लोकांची मने खचली होती, कोणाचा कोणाला पत्ता लागत नव्हता, कोण कायमचे सोडून गेले होत