India Languages, asked by Anonymous, 11 months ago

प्रेमात आत्महत्या करणे बरोबर आहे का?

Answers

Answered by Anonymous
2

Explanation:

समाजामध्ये आत्महत्या करण्याचं वाढतं प्रमाण चिंताजनक आहे. आत्यंतिक नैराश्याच्या पोटी केल्या जाणाऱ्या आत्महत्या प्रयत्नपूर्वक रोखायला हव्यात. त्यासाठी काय करायला हवं? काय करता येऊ शकेल?

* इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये रॅगिंगला बळी पडलेल्या १९ वर्षांच्या सुधाकरची गळफास लावून आत्महत्या

* पतीच्या मारहाणीला त्रासलेली बकुळा. तरुण वय, शिक्षण नाही, कोणाचाच आधार नाही, कोणाची मदत घ्यावी कळत नव्हते. पतीच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून तिने विष घेतले.

* लातूर जिल्ह्यतील शंकरने दर वर्षीच्या दुष्काळाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली.

* बँकांच्या कर्जाचे बळी – ९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

* सततच्या दुखण्याला त्रासून कमलाबाईंनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या केली.

* जीव दिला.

* पीडित मंगलाने हताश होऊन नदीत उडी मारून जीव दिला.

* कार्यालयातील सहकाऱ्याने शमिराचे अश्लील फोटो सोशल नेटवर्कवर टाकल्यामुळे विमनस्क अवस्थेत शमिराने झोपेच्या गोळ्या घेऊन या जगाचा त्याग केला.

* परीक्षेत पहिला न आल्यामुळे आता आपल्याला आईवडील ओरडतील म्हणून शाळेतून घरी येताना अक्षयने धावत्या रेल्वेसमोर उडी मारली. त्याच्या दप्तरात असलेल्या वस्तूंमुळे त्याच्या पालकांचा शोध घेता आला.

मनाला उद्विग्न करणाऱ्या आत्महत्यांच्या या घटनांचे स्वरूप दिवसेंदिवस उग्र होते आहे. उपलब्ध माहितीवरून दिसते की, आपल्या देशात बिहारमध्ये सर्वात जास्त आत्महत्या होतात, तर महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा आहे. २०१२ साली देशात १ लाख ३५ हजार ४४५ आत्महत्यांच्या घटना घडल्या. २०१३ साली देशातील १ लाख ३४ हजार ७९९ व्यक्तींनी जीव दिला. याशिवाय अनेक घटनांची नोंदच झाली नसेल अथवा अनेक हत्येच्या/ खुनाच्या घटना आत्महत्या म्हणून नोंदल्या गेल्या असतील. समाजातील सर्व स्तरांमध्ये घडणाऱ्या आत्महत्यांची कारणे असंख्य आहेत.

HOPE IT HELPED ✌️❤️❤️

HAVE A NICE DAY

:)

Similar questions