प्राणी आणि मानव निबंध
Answers
Answer:
देशभरात आज 50 अतिसंरक्षित व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आहेत. तरी वन्य प्राणी आणि मनुष्यातील संघर्ष वेळीअवेळी उफाळून येतो. मध्य प्रदेशातील शाहडोल येथे 2018च्या सुरुवातीलाच विद्युत प्रवाह असलेल्या तारेच्या स्पर्शाने तर कर्नाटक बंदीपूर येथे दोन वाघ आणि एका हत्तीचा विषप्रयोगाने झालेला मृत्यू वन्यजीवप्रेमींना चटका लावून गेला. 1972-73 साली सुरू झालेल्या व्याघ्र प्रकल्पांचा उद्देश केवळ वाघाचे संवर्धन इतकाच मर्यादित नव्हता. किंबहुना त्याला वाघाचे नाव देऊन वन्यजीवांचे नैसर्गिक संरक्षण व्हावे या हेतूने व्याघ्र प्रकल्पांची निर्मिती सुरू झाली आणि हिंदुस्थानातील पहिला व्याघ्र प्रकल्प जिम कॉर्बेट यांच्या नावे सुरू झाला.
वाघाच्या माध्यमातून जैवविविधतेचे आणि निसर्गाचे संवर्धन व्हावे हा व्यापक हेतू त्यामागे दडला आहे. काझीरंगा येथे व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून गेंडय़ाचे, कर्नाटकला बंदीपूर व्याघ्र प्रकल्पात हत्तींचे, सुंदरबन येथे खाऱया पाण्यातील मगरी असो अथवा एकेकाळी मेळघाटमधील सर्वात जास्त संख्या असलेले गौर (बायसन) असो, या सर्व लोप पावत चाललेल्या वन्यजीवांना संजीवनी व्याघ्र प्रकल्पांनी मिळवून दिली. व्याघ्र प्रकल्पांची सुरुवात होऊन संवर्धनात लक्षणीय यश देखील प्राप्त होऊ लागले. मात्र आता वन्यजीवांच्या आणि नागरिकांच्या समोर नवीन मोठे आव्हान उभे राहिले आहे. विशेषतः गेल्या काही वर्षांत याबाबतीत विदारक चित्र समोर येऊ लागले आहे. त्यातून सृष्टीतील या दोन जिवांचा आपसातला संघर्ष भविष्यातील मोठय़ा नैसर्गिक आपत्तीची चाहूल देत आहे. यातून वेळीच बोध घेतला गेला नाही तर येणाऱया काळात उद्भवणाऱया परिस्थितीवर कुणाचेच नियंत्रण राहणार नाही.
रोजच्या घटना बघता वन्य प्राण्यांचे होणारे मृत्यू आणि नागरिकांचा संघर्ष हा सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकविणारा आहे. कधी अपघातात, कधी शिकार, कधी विद्युत तारेच्या स्पर्शाने तर कधी मानवी वस्तीत प्रवेश केल्याने झालेली जीवितहानी येणाऱया काळातील भयावह परिस्थितीचा अंदाज देण्यास पुरेशी आहे. भूतकाळातील आकडे बघता हा विषय गंभीर वळणावर उभा आहे.
Explanation:
Vanya pran vah Manav sahasambandh