Geography, asked by poojabagate11, 7 hours ago

प्राणीज संसाधनाच्या अति वापरामुळे मानवी जीवन व पर्यावरण यांवर काय परिणाम होतो ते शोधा.​

Answers

Answered by ppremkhanna5
0

Explanation:

good afternoon l have an

Answered by yassersayeed
0

मानवी जीवनावर परिणाम करणारी कोणतीही बाह्यशक्ती म्हणजे पर्यावरण होय.

  • पृथ्वीवर सर्वात बुद्धिवान जर कोणी असेल तर तो मानव. त्यामुळे त्याने आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून पर्यावरणाकडून जसा पाहिजे तसा आपला विकास साधून घेतला. मात्र, परतफेड करण्याचे साफ विसरला.
  • पर्यावरणाने मानवाला अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत सोयीसह अन्य अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतु, मानवाच्या स्वार्थी, अज्ञानी, अविचारी वृत्तीने पर्यावरणाचा बेसुमार वापर करून त्याचा र्‍हास केल्यामुळे अनेक जटील समस्या निर्माण झाल्या आहेत.
  • पर्यावरणीय व्यवस्थेत असंतुलितपणा निर्माण होऊन प्राणिमात्रास धोका उत्पन्न होत आहे.
  • मानवाच्या अविचारी वागण्यामुळे जल, हवा, ध्वनी, भूप्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. औद्योगिक व रासायनिक दूषितीकरणामुळे विविध प्रकारचे आजार वाढत आहेत.
  • ओझोन वायूचा क्षय, आम्लपर्जन्य, सागरी परिसंस्थेचा असमतोल, प्राणी व पक्षी यांचे नामशेष, नागरीकरण, वाळवंटीकरण इत्यादी समस्येसोबत वातावरणात आकस्मिक बदल हे नित्याचेच झाले. त्यामुळे रोज नवे संकट आपणासमोर तोंड वासून उभे होत आहे.
  • आपण अन्नाशिवाय एखादा दिवस, पाण्यावाचून एखादा तास जिवंत राहू शकतो मात्र हवेतील ऑक्सिजनाशिवाय क्षणभरसुद्धा जिवंत राहू शकत नाही आणि ऑक्सिजन निर्मितीचे सर्वात मोठे कार्य पर्यावरणातील वृक्ष करत असतात.
  • वनस्पती स्वत:चे अन्न स्वत: तयार करतात आणि हवेतील कार्बन डायऑक्साइड म्हणजे खराब हवा-वायू शोषून मानवास उपयुक्त असे ऑक्सिजन म्हणजे शुद्ध वायू हवेत सोडतात. त्यामुळे वनस्पती व वृक्षांची लागवड व संवर्धन करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.

Similar questions