प्राणी मानसा ना कशा प्रकारे उपयोगी पड़ताt
Marathi amhi have ahot ka
Answers
Answer:
प्राणि : सजीव सृष्टीतील चेतनायुक्त विभागातील [⟶ जीव] क्रियाशील सजीवांना प्राणी असे संबोधण्यास हरकत नाही किंवा कोणताही सजीव प्राणी की, जो प्राण्याचा गुणधर्म दर्शवीत असून वनस्पती नाही त्यास प्राणी म्हणावे अशीही व्याख्या करता येईल. यावरून प्राणी व ⇨ वनस्पती यांतील भेद पाहून त्यांस वेगळे करणे पूर्णतया शक्य नाही, असे दिसून येते. याचे कारण असे की, काही जीव इतके साधे आहेत की, त्यांची गणना प्राणी वा वनस्पती या दोहोंपैकी कोणत्या गटात करावी, हे ठरविणे कठीण होते.
सामान्यतः प्राणी कोणते ते पुढील लक्षणांवरून ठरवले जाते. प्राण्याच्या कोशिका (पेशी) जीवद्रव्याने [जीवनाचा आविष्कार ज्यामुळे अनुभवास येतो अशा मूलभूत द्रव्याने ⟶ जीवद्रव्य] युक्त असतात त्यांत हरितद्रव्य नसते. जननक्षमता (जास्तीत जास्त स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करण्याची क्षमता) असते. सर्व प्राणी पूर्वी अस्तित्वात असलेल्या प्राण्यांपासूनच निर्माण होतात. मर्यादित वाढ होते. वाढ पूर्ण झाल्यावर नवीन अवयव निर्माण होत नाहीत. प्राणी संवेदनक्षम असतात व काही अपवाद सोडल्यास ते एकाच जागी खिळून नसतात. अमीबासारखे केवळ सूक्ष्मदर्शकातून दिसू शकतील इतक्या सूक्ष्म आकारमानापासून ते देवमाशासारखे अतिप्रचंड (निळ्या देवमाशाची लांबी सु. ३४ मी. आणि वजन सु. १,३२,००० किग्रॅ. असू शकते.) आकारमानाचे सर्वव्यापी सु. १० लाख प्राणी ज्ञात आहेत. अमीबा या प्रोटोझोआ (आदिजीव) संघातील एककोशिक (एकपेशीय) साध्या प्राण्यापासून अवयव तंत्रे (संस्था), ज्ञानेंद्रिये यांची जटिल (गुंतागुंतीची) संरचना असलेल्या पक्षी व मानवासह स्तनी प्राण्यापर्यंत सर्व प्राण्यांत आढळणारी उल्लेखनीय बाब म्हणजे आकार, रूप, संरचना यांची विविधता होय. भिन्न प्राण्यांतील प्रथिने भिन्न असतात. प्राण्यांतील वैचित्र्य व विविधता यांचे हे कारण असावे. काही प्राणी परिसराशी जुळवून घेतात, तर काही परिसराचेच एक घटक बनतात [⟶ जीवसंहति]. प्राण्यांमध्ये विलक्षण असे दैनिक व ऋतूनुसार बदलणारे लयबद्ध शारीरिक चक्र आढळते. [⟶ आवर्तिता, सजीवांतील]. सर्व मूलभूत गरजांबाबत प्राण्यांत एकसूत्रता आढळते. सर्व प्राणी शरीरप्रक्रियेसाठी ऊर्जानिर्मिती करून ती वापरतात. शरीरांतर्गत क्रियांचा समतोल साधून ते शारीरिक प्रक्रिया कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असतात. प्राणी वैशिष्ट्यपूर्ण अशा जीवनचक्रातून जातात. प्राण्यामध्ये ⇨ क्रमविकास (उत्क्रांती) झाला आहे व होत आहे आणि आज अस्तित्वात असलेल्या प्राणिजाती या ⇨ नैसर्गिकनिवडीच्या क्रमविकासी प्रक्रियेतील शेष प्राणिजाती होत. म्हणजे बरेच प्राणी आणि प्राणिजाती कालौघात नष्ट झालेल्या आहेत. क्रमविकासाच्या प्रक्रियेचा प्राण्यांवर दूरगामी परिणाम झालेला आहे आणि त्यामुळे प्राणिसमूह परिसराशी एकरूपता साधण्याचा प्रयत्न करतात [⟶ अनुकूलन] किंवा क्रमविकासामुळे त्यांच्यात भिन्नताही निर्माण होते. प्राण्यांमध्ये समान रूप, समान आकारमान असेल, तर समान वंशपरंपरा आढळते. प्राण्यांमध्ये निश्चित स्वरूपाचे कार्यबद्ध शरीरसंघटन सुनियोजित आनुवंशिकतेने प्राप्त होत असते.
प्राण्यांचे मानवी जीवनातील महत्त्व : मानवाच्या मूलभूत गरजेतून त्याचा प्राण्याशी संबंध आला असावा व ही मूलभूत गरज म्हणजे अन्न होय. प्राचीन मानववंशाच्या इतिहासावरून मानव प्राण्यांचा अन्न म्हणून उपयोग करू लागला असे दिसते. शेतीचा शोध हा नंतरचा असणे शक्य आहे. मानव हा एक प्राणीच असल्याने व सृष्टीचा अविभाज्य घटक असल्याने, त्याचा प्रसंगी इतर जीवसृष्टीशी अपरिहार्य संबंध येत राहिला आहे. वेळोवेळी मानवाचा इतर प्राण्यांशी संबंध येत असल्याने आता प्राण्यांच्या मानवी जीवनातील स्थानाचे पुढील मुख्य दोन प्रकारे वर्णन करता येते : (१) मानवास उपयोगी प्राणी आणि (२) मानवास उपद्रवी प्राणी