Hindi, asked by bankarrahul2003, 18 days ago

पूर्ण पराभव करणे' या अर्थाचा खालीलपैकी कोणता वाक्प्रचार नाही? *
धूळ चारणे .
मात करणे.
हात पाय गळणे.
नामोहरम करणे.​

Answers

Answered by kakadrajshri
14

हात पाय गळणे

पूर्ण पराभव करणे या अर्थाचा हा वाक्प्रचार नाही.

hope it helps you.

Answered by rajraaz85
1

Answer:

हात पाय गळणे

Explanation:

अर्थ - हातपाय गळणे म्हणजे खूप थकवा येणे.

वाक्यात उपयोग -

  • दिवसभर काम करून चेतनचे हात पाय गळाले.
  • कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे दिवसभर मालकाचे स्वप्न पूर्ण करण्यात हातपाय गळाले.

धूळ चारणे, मात करणे आणि नामोहरण करणे या तिन्ही वाक्प्रचारांचा अर्थ पूर्ण पराभव करणे असाच होतो.

वाक्यप्रचारांचा वाक्यात उपयोग खालीलप्रमाणे -

धुळ चारणे -

  • पाकिस्तानच्या संपूर्ण संघाला दहा षटकात बाद करून भारताने पाकिस्तानला धूळ चारली.
  • कबड्डीच्या सामन्यात आमच्या शाळेतील संघाने दुसऱ्या शाळेतील संघाला संपूर्णपणे धुळ चारली.

मात करणे -

  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी मोगलांवर मात केली.

नामोहरण करणे-

  • हॉकीच्या सामन्यात भारताच्या संघाने इंग्लंडच्या संघाला नामोहरण केले.
Similar questions