प्राणी संग्रहालयाची माहीती लिहा!
Answers
Answer:
सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय हे औरंगाबाद मधील उद्यान व प्राणी संग्रहालय आहे. हे उद्यान १९८५ मध्ये छोट्या स्वरूपात सुरु करण्यात आले होते. हे उद्यान शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या बाजूला आहे. सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय मराठवाड्यातील एकमेव प्राणी संग्रहालय आहे. या प्राणी संग्रहालयात विविध प्रकारचे २०० पेक्षा जास्त प्राणी व पक्षी आहेत. हे एक राज्यातील विशेषतः मराठवाड्यातील एक प्रमुख प्रेक्षणिय स्थळ असून विद्यार्थ्यांच्या सहलीसह लाखो पर्यटक दरवर्षी प्राणिसंग्रहालयाला भेटी देतात. याचे "सिद्धार्थ" नाव हे गौतम बुद्धांच्या नावावरून ठेवण्यात आले आलेले असून उद्यानात बुद्धांचा एक भव्य पुतळा बसवण्यात आला आहे.[१]
प्राण्यांसाठी असलेली अपुरी जागा, सोयी-सुविधांचा अभाव, चुकीच्या पद्धतीने ठेवलेले पिंजरे या कारणांमुळे केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने २६ नोव्हेंबर २०१८ रोजी या प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द केली होती.[२] मात्र पुढे १२ डिसेंबर २०१८ रोजी केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने या निर्णयास स्थगिती दिली.[३]
वैशिष्ट्ये
औरंगाबादमधील नागरिकांसाठी व औरंगाबादमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी सिद्धार्थ उद्यान आणि या उद्यानाच्या परिसरात असलेले प्राणिसंग्रहाल एक आकर्षणाचा विषय व महत्त्वाचे प्रर्यटनस्थळ आहे. शहरातील सर्वांत मोठे उद्यान सिद्धार्थ गार्डन मध्यवर्ती बसस्थानकाजवळ असल्याने शहरातील लोकांसह परगावाहून या उद्यानामध्ये जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय असते. हे मराठवाड्यातील एकमेव प्राणिसंग्रहालय असल्याने मराठवाड्यातून अनेकजण, शाळांच्या सहली येथे येत असतात. उद्यानाच्या परिसरात मत्स्यालय देखील आहे, ज्यात विविध प्रजातींचे मासे आहेत. हैदराबाद मुक्तिसंग्राम संग्रहालय देखील उद्यानाच्या परिसरात आहे, त्यामध्ये मुक्तिसंग्रामात सहभागी झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांची माहिती व मुक्तिसंग्रामाचा इतिहास आहे. उद्यानात लहान मुलांसाठी वेगवेगळ्या खेळण्याची व्यवस्था आहे. सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाला दिवसाकाठी भेट देणाऱ्यांची संख्या ८०० ते एक हजारांच्या घरात आहे. यामध्ये लहान मुलांची संख्या लक्षणीय असते. सुटीच्या दिवशी यापेक्षा जास्त नागरिक उद्यानात येतात. तर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये उद्यानाला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत जास्त वाढ होत असते. सिद्धार्थ उद्यानासाठी मोठ्या व्यक्तींना २० रुपये तर, लहान मुलांना दहा रुपये प्रवेश शुल्क आकारले जाते. प्राणिसंग्रहालयासाठी मोठ्या व्यक्तींना ५० रुपये तर, लहान मुलांसाठी २० रुपये शुल्क आकारले जाते. उद्यान अधीक्षक विजय पाटील यांच्यानुसार, 'या उद्यानाचे २६ एप्रिल रोजीचे उत्पन्न १ लाख २७ हजार रुपये इतके होते, तर प्राणिसंग्रहालयाचे उत्पन्न ५४ हजार रुपये होते.
Explanation:
Hope you got it