Hindi, asked by arvindmadkine, 9 months ago

प्राणिसंग्रहालय निभंध

Answers

Answered by Anonymous
1

Answer:

Hi,

Explanation:

प्राणिसंग्रहालय

नमस्कार मित्रांनो आज आपण मी पाहिलेले प्राणी संग्रहालय मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधामध्ये प्रवासवर्णन, घटनेचे वर्णन, ठिकाणाचे वर्णन याबाबत तुम्हाला आलेला अनुभव शाब्दिक स्वरूपात मांडायचा असतो. यामध्ये काही प्रमाणात तुम्हाला तुमच्या स्वतःच्या भाषेत आणि शैलीत निबंध लिहायचा असतो. मित्रांनो वर्णनात्मक निबंध लिहीत असताना विषय वेगवेगळे दिले जातात त्यानुसार आपल्या जवळ असलेली किंवा माहित असलेली माहिती याची लेखन शैली व बारकावे वेगवेगळ्या पद्धतीने शाब्दिक चित्रकृती साधून योग्य सांगड घालून प्रस्तुतीकरण करणे गरजेचे असते जसे की निबंधाचे विषय वेगवेगळे असू शकतात खालील प्रमाणे विषय किंवा शिक्षक असू शकतात ते वाचून घ्या मग खाली निबंध दिला आहे.

रविवारी आम्ही रेनबो पार्क झू  बघायला गेलो होतो. या प्राणिसंग्रहालयाचे नाव ' जिजामाता उद्यान ' असे आहे. परंतु सर्वजण प्रेमाने ' राणीची बाग' म्हणतात. समोरच्या भव्य दरवाजातून आत गेल्यावर प्राण्याचे वेगवेगळे आवाज येऊ लागले. तेथे अनेक प्रकारचे प्राणी आहे. एका कुंपणाच्या तीन हत्ती आणि त्यांचे पिल्लू बांधलेले होते. ते ऊस खात होते. त्याचे मोठे शरीरं सतत हलणारे कान व सोंड आम्ही पाहतच राहतो. पुढच्या पिंजऱ्यात होती माकडे. कोणी पकडापकडी करत होती तर कोणी झोका घेत होती. अस्वले कितीतरी मोठी आणि केसाळ. त्यांच्यासाठी बनवलेल्या गुहे सारख्या ठिकाणी बसली होती.

तेवढ्यात मोठी डरकाळी ऐकू आली पलीकडे वाघाचे व सिंहाचे पिंजरे होते. सिंहाची आयाळ खूप सुंदर होती. वाघाच्या अंगावरचे काळे पिवळे पट्टे पाहून भीतीही वाटत होती आणि बघतही रहावे असे वाटत होते. विशेषता: पांढरे वाघ फारच ऐटदार होते. थोडे पुढे गेल्यावर मोठा गेंडा होता. त्याचे ते अगडबंब शरीर पाहून भितीच वाटत होती. अशाप्रकारे ससे, हरणे, काळवीट, साप, मोर, इतर पक्षी वगैरे पाहता पाहता मन आनंदून गेले होते.

मित्रांनो या निबंधामध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो I

<><><><><>

brainliest plzz.....

ʕ→ᴥ←ʔ    

❣❣❣❣❣

Similar questions