Economy, asked by akashsontakke62, 9 months ago

पूर्ण स्पर्ता मनजे काय वह पूर्ण स्वदेशी कीमत निश्चिती की संकल्पना समतोल कीमत स्पष्ट करा मराठी मध्ए​

Answers

Answered by Anonymous
32

Explanation:

Accessibility Tools

Increase Text

Decrease Text

Grayscale

High Contrast

Negative Contrast

Light Background

Links Underline

Readable Font

Reset

Skip to content

मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती

उत्पादनसंस्था

>अर्थशास्त्र>उत्पादनसंस्था

उत्पादनसंस्था : आवश्यक ते उत्पादन घटक इष्ट प्रमाणात वापरून ग्राहकांच्या गरजा भागविणाऱ्या वस्तूंची किंवा सेवांची निर्मिती करणाऱ्या संस्थांना उत्पादनसंस्था म्हणतात. उद्योगधंद्यामध्ये वस्तूचे उत्पादन करण्यासाठी एक किंवा एकाहून अधिक उत्पादनसंस्था असतात. उद्योगधंद्याची व्याख्या करताना ‘वस्तू’ (कमॉडिटी) या कल्पनेची निश्चिती करावयास हवी. प्रत्येक उत्पादनसंस्था उत्पादनघटकांच्या साहाय्याने जी वस्तू निर्माण करते, तिला ‘उत्पादित वस्तू’ (प्रॉडक्ट) असे म्हणतात. निरनिराळ्या उत्पादन संस्थांच्या, सामान्यतः सारख्या स्वरूपाच्या प्रतिस्थापनीय अशा सर्व उत्पादित वस्तूंचा उल्लेख वस्तू असा केला जातो. जेव्हा उद्योगधंद्यामध्ये एकच मक्तेदार उत्पादनसंस्था असते, तेव्हा ‘वस्तू’ आणि ‘उत्पादित वस्तू’यांतील फरक नष्ट होतो. वस्तू एकासारख्या एक असून उद्योगधंद्यामध्ये अनेक उत्पादनसंस्था उत्पादित वस्तू निर्माण करीत असतात, तेव्हा उद्योगधंद्यात पूर्ण स्पर्धा असते. पूर्ण स्पर्धेच्या परिस्थितीत अनेक उत्पादनसंस्था उत्पादित वस्तू लहान परिमाणात उत्पादन करीत असतात त्यामुळे कोणत्याही एका उत्पादनसंस्थेला आपल्या उत्पादित वस्तूचे परिमाण कमीअधिक करून, वस्तूच्या बाजारी किंमतीवर परिणाम करता येत नाही. जेव्हा वस्तू पूर्णपणे सारख्या नसतात, तेव्हा उद्योगधंद्यांतील निरनिराळ्या उत्पादनसंस्था ग्राहक आकर्षित करून घेण्याच्या उद्देशाने वस्तुभेद करीत असतात. उदा., वेगवेगळ्या नावांच्या साबणांना त्यांची वेगवेगळी आणि स्वतंत्र मागणी असते कारण वस्तुभेदाच्या अवस्थेत ग्राहक ‘लक्स’ साबण किंवा ‘हमाम’ साबण मागत असतो, तो केवळ साबण मागत नाही. आपल्या सभोवती सगळीकडे अशा उत्पादित वस्तू असतात, वस्तू नसतात म्हणून जर वस्तूची व्याख्या होत नाही, तर उद्योगाची कल्पनाही ग्राह्य नाही. यासाठी चेंबरलिनने आपला मक्तेदारी स्पर्धेचा मूल्यसिद्धांत पुढे मांडताना, उद्योगाची कल्पना टाकून दिली आणि आपले लक्ष उत्पादित वस्तू आणि उत्पादनसंस्था यांवर केंद्रित केले l

Answered by bj6201335205
0

Answer:

एखाद्या वस्तूच्या किंवा सेवेच्या एककासाठी द्यावे लागणारे मूल्य. हे मूल्य निरनिराळ्या पद्धतींनी मोजता येईल, कारण इष्ट वस्तू किंवा सेवा मिळविण्यासाठी द्यावी लागणारी वस्तू किंवा सेवा निरनिराळ्या प्रकारची असू शकेल. रोजच्या व्यवहारात वस्तुनियम करणे गैरसोयीचे असल्याने पैशाचा वापर करावा लागतो. आधुनिक अर्थव्यवस्थेत वस्तू किंवा सेवा खरीदण्याची शक्ती पैशात किंवा चलनात असते. एखाद्या वस्तूची किंवा सेवेची किंमत म्हणजे त्या वस्तूसाठी किंवा सेवेसाठी द्यावा लागणारा पैसा.

किंमतीचे प्रकार

किंमती निरनिराळ्या स्वरूपात आढळतात. जागेचा किंवा घराचा वापर करण्यासाठी द्यावी लागणारी किंमत म्हणजेच खंड अथवा भाडे. श्रमाच्या किंमतीस वेतन, पगार किंवा मोबदला म्हणतात. भांडवलाची किंमत म्हणजे त्यासाठी द्यावे लागणारे व्याज. वाहतुकीसाठी द्याव्या लागणाऱ्या किंमतीस भाडे किंवा आकारणी म्हणतात. दलालाच्या कामाची किंमत ती दलाली. अभिकर्त्याच्या (एजंट) कामाची किंमत म्हणजे त्याचे कमिशन. परकीय चलनाची किंमत चलनबाजारातील व्यवहारांच्या दरांनी दर्शविली जाते. किरकोळ व्यवहारांच्या बाजारात ‘घाऊक किंमती’ आढळतात. रोखीचे व्यवहार चालणाऱ्या बाजारातील किंमतीस ‘रोख किंमत’ ही संज्ञा आहे, तर वायदेबाजारातील किंमतीस ‘वायदे किंमत’ म्हणतात. बाजारावर नियंत्रण असल्यास तेथील व्यवहार नियंत्रीत किंमतीत व्हावेत अशी अपेक्षा असते; परंतु ते व्यवहार जर नियंत्रणाचे उल्लंघन करून नियंत्रित किंमतीपेक्षा जास्त दराने झाले, तर त्यासाठी काळ्या बाजारातील किंमत द्यावी लागली, असे म्हणतात. अंतर्गत व्यापारातील किंमतीस ‘अंतर्गत किंमत’ म्हणतात, परंतु परराष्ट्रीय व्यापारातील किंमतींना ‘आंतरराष्ट्रीय किंमत’ म्हणतात. आयात वस्तूंच्या किंमतीस ‘आयात किंमत’ व निर्यात वस्तूंच्या किंमतीस ‘निर्यात किंमत’ असे संबोधतात.

किंमतींचे महत्त्व

अर्थव्यवस्था सुरळीच चालावयाची, तर किंमतींकडे विशेष लक्ष पुरवावे लागते. उपभोक्ते व उत्पादक यांचे निर्णय किंमती विचारात घेऊनच केले जातात. किंमतींवर अनेकांचे उत्पन्न अवलंबून असते. सरकारला किंमतींविषयी योग्य धोरण आखावे लागते आणि ते कार्यवाहीत आणावे लागते. बॅंका, व्यापारी, धनको, ऋणको, बचत करणारे आणि खर्च करणारे या सर्वांच्या दृष्टीने किंमती फार महत्त्वाच्या आहेत. अर्थव्यवस्थेतील बहुतेक व्यवहार किंमतीवर नजर ठेवून होत असतात; म्हणूनच किंमत ही अर्थशास्त्रातील एक केंद्रीभूत संकल्पना आहे. तिला अर्थशास्त्राची ‘रडार’ असेही म्हटले जाते.

hope its help u...

mark me as a brainliest.....

Similar questions