World Languages, asked by krhishi88, 7 months ago

प्राण्यांचा पोषणाचे क्रियेचे टप्पे कोणते ते लिही.
D​

Answers

Answered by aditi3925
11

प्राण्यांचे वर्तन

प्राणिवर्तनासंबंधीचे संशोधन : इतिहास

अभ्यासाचे प्रकार

वर्तनाचे प्रकार

संवेदनाक्षमता

चलनक्षमता

मेंदू व तंत्रिका तंत्र यांचे महत्त्व

साठवण

वर्तनाची शरीरांतर्गत कारणे

शिकणे

परिस्थितीनुसार होणारे वर्तन

प्रतिसाद

प्राण्यांचे वर्तन

प्राणी स्वतंत्रपणे किंवा समूहात असताना ज्या निरनिराळ्या हालचाली किंवा कामे करतात त्यांना प्राण्यांचे वर्तन असे म्हणतात. प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी निरनिराळ्या तऱ्हेची तंत्रे वापरण्यात आली असून प्राण्यांची वाढ, रचना, वेगवेगळ्या शरीरक्रिया, भोवतालची परिस्थिती आणि आनुवंशिकता यांच्या संदर्भात प्राणी कशा तऱ्हेने वर्तन करतात याचाही अभ्यास करण्यात आला आहे. प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास ही एक स्वतंत्र शास्त्रशाखा झाली असून या शाखेचा मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि भौतिकी यांच्याशी संबंध येतो.

प्राणिवर्तनासंबंधीचे संशोधन : इतिहास

प्राणी वेगवेगळ्या परिस्थितींत कसा वागतो? त्याच्या मूळच्या वर्तणुकीत किंवा वर्तनात काही कारणांमुळे फरक पडला आहे का? हा फरक थोड्या अवधीपुरताच आहे का दीर्घावधीकरिता आहे? या वर्तनातील फरकामुळे प्राण्याच्या शरीररचनेत किंवा शरीरक्रियेत काही बदल झाला आहे का? इ. निरनिराळ्या दृष्टिकोनांतून फार पूर्वीपासून प्राणिवर्तनाचा अभ्यास झाल्याचे आढळून येते. पूर्वी होऊन गेलेल्या सॉलोमन राजाच्या काळातही लोक प्राण्यांपासून अनेक गोष्टी शिकत असत. मुंगी किंवा कोल्हा यासारखे प्राणी कसे वागतात? परिस्थिती बदलल्यावर त्यांच्या वर्तनात कसा फरक पडतो? इ. गोष्टींचे ते निरीक्षण करीत असत. मनुष्य प्राण्यातही सहसा न आढळणारे बदललेले वर्तन या निरनिराळ्या प्राण्यांमध्ये आढळून येते. अशा तऱ्हेने सर्वसाधारण जनतेला कीटकांच्या वर्तनाविषयी कुतूहल असले, तरी एकोणिसाव्या शतकापर्यंत या विषयाच्या ज्ञानात प्रगती झाली असल्याचे दिसत नाही. विसाव्या शतकात सुप्रसिद्ध इंग्लिश शास्त्रज्ञ चार्ल्‌स डार्विन यांनी ⇨ नैसर्गिक निवडहा सृष्टीच्या क्रमविकासाचा (उत्क्रांतीचा) महत्त्वाचा सिद्धांत जगापुढे मांडला. आपली मते मांडताना डार्विन यांनी प्राणिसृष्टीचा क्रमविकास होत असताना प्राण्यांच्या शरीरात होणाऱ्या रूपांतरणाला (बदलाला) फार महत्त्व दिले आहे. बदलत्या परिस्थितीनुसार जसजसे प्राण्यांचे वर्तन बदलत जाते तसतसे त्यांच्या निरनिराळ्या अवयवांत रूपांतरण होत जाते.

डार्विननंतर अनेक अमेरिकन आणि यूरोपियन शास्त्रज्ञांनी या विषयावर संशोधन केल्याचे आढळते. अमेरिकन शास्त्रज्ञांत ⇨ टॉमस हंट मॉर्गन, ⇨झाक लब, रेमंड पर्ल, ई. बी. विल्सन, जी. एच्. पार्कर, एस्. ओ. मास्ट आणि एस्. जे. होम्स यांचा समावेश होतो, तर यूरोपियन शास्त्रज्ञांत ई. क्लापारेद, एच्. ड्रीश, ⇨ कॉजवे लॉईड मॉर्गन, डब्ल्यू. ए. नागेल, ⇨ इव्हान प्यिट्रॉव्ह्यिच पाव्हलॉव्ह, जी. जे. रोमानिस, एम्. फेरव्होर्न आणि जे. फोन यूक्सक्यूल यांचा समावेश होतो. आर्. एम्, यर्किस आणि ⇨ एडवर्ड ली थॉर्नंडाइक यांसारख्या विद्वान मानसशास्त्रज्ञांनीही प्राण्यांच्या वर्तनाविषयी संशोधन केले आहे.

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीला आनुवंशिकी, शरीररचनाशास्त्र, शरीरक्रियाविज्ञान इ. विज्ञानशाखांमध्ये शास्त्रज्ञांनी विशेष लक्ष घातल्यामुळे प्राण्यांच्या वर्तनासंबंधी फार कमी संशोधन झाले. त्यातसुद्धा अनेक जातींच्या प्राण्यांपैकी फक्त कीटकांच्याच ⇨ सहजीवनाचा अभ्यास करण्यात आला. प्राण्यांमध्ये जे निरनिराळे शारीरिक बदल होत असतात ते केवळ तो प्राणी जगण्याच्या दृष्टीने होत असतात, असा सर्वसाधारण समज होता. १९२० साली महत्त्वाची अशी दोन संशोधने झाली.

(१) अनेक कीटक आणि पक्षी जननकालात विशिष्ट आवाज (ज्याला ‘गाणे’ म्हणतात) काढून भिन्नलिंगी प्राण्याला आकर्षित करतात. या गाण्याचे महत्त्व एच्. ई. हौअर्ड यांनी विशद केले.

(२) कोंबड्यांच्या समूहात आढळणाऱ्या सामाजिक वर्चस्वासंबंधीचे संशोधन.

यानंतर पुढील महत्त्वाचे संशोधन करण्यात आले :

(१) डब्ल्यू. सी. ॲली यांनी प्राण्यांच्या समूहाचे व प्राण्यांच्या सहजीवनाचे महत्त्व विशद करणारे लेख प्रसिद्ध केले.

(२) सी. आर्. कार्पेटर यांनी नरवानरांमधील (प्रायमेट्समधील) सहजीवन आणि समूहरचना यांचा अभ्यास केला. ⇨ कॉनरॅड झाकारियास लोरेन्ट्स यांनी पक्ष्यांच्या सामूहिक संबंधांचा विचार केला.

(४) डब्ल्यू. एम्. व्हीलर यांनी कीटकांच्या वर्तनावर संशोधन केले.

(५) ए. ई. एमर्सन यांनी वाळवी-मुंग्यात आढळणाऱ्या सामाजिक भेदांचे विवेचन केले.

(६) टी. सी. श्नायली यांनी सैनिकी मुंग्याच्या जीवनाचा अभ्यास केला आणि

(७) ⇨ कार्लफोन फ्रिश यांनी प्रयोगाच्या आनुषंगाने मधमाश्यांची भाषा समजून घेतली.

दुसऱ्या महायुद्धामुळे वरील विषयातील संशोधनात यूरोपमध्ये खंड पडला; परंतु महायुद्ध संपल्यानंतर या विषयात पुन्हा संशोधन करण्यास सुरुवात झाली.

(१) ⇨ नीकोलास टिनवर्जेन आणि इतर यूरोपियन शास्त्रज्ञांनी प्राण्य़ांच्या ⇨ सहजप्रेरणेच्या प्राणिवर्तनाशी असलेल्या संबंधांचा अभ्यास केला वबिहेव्हियर या नावाचे शास्त्रीय मासिक प्रकाशित करण्यास सुरुवात केली.

(२) ई. ए. आर्मस्ट्राँग, डी. लॅक, डब्ल्यू. एच्. थॉर्प व इतर ब्रिटिश संशोधकांनी पक्ष्यांच्या

Answered by tushargupta0691
0

उत्तर द्या:

पोषण ही एक जटिल प्रक्रिया आहे ज्यामध्ये समावेश होतो: (i) अंतर्ग्रहण, (ii) पचन, (iii) शोषण, (iv) आत्मसात करणे आणि (v) उत्सर्जन. कार्बोहायड्रेट्सचे पचन, स्टार्चसारखे, बुक्कल पोकळीमध्ये सुरू होते

स्पष्टीकरण:

  • प्राण्यांचे पोषण हे प्राण्यांच्या आहाराच्या सवयींवर अवलंबून असते. अन्न घेण्याच्या प्रक्रियेला अंतर्ग्रहण म्हणतात. वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये सेवन करण्याची पद्धत वेगळी असते. उदाहरणार्थ- मधमाश्या आणि हमिंगबर्ड्स वनस्पतींमधून अमृत शोषतात, अजगर आपला शिकार गिळतो आणि गुरे गवत खातात. प्राण्यांच्या आहाराच्या वेगवेगळ्या सवयी उत्क्रांतीचा परिणाम आहेत. पार्थिव प्राण्यांमध्ये, सर्वात पूर्वीचे स्वरूप मोठे उभयचर होते जे मासे खातात. बेडकांसारखे उभयचर लहान मासे आणि कीटकांना खायला घालत असताना, सरपटणारे प्राणी इतर प्राणी आणि वनस्पती खाऊ लागले.
  • विशिष्ट अन्न स्रोत आणि अर्थातच खाण्याच्या विशिष्ट पद्धतींकडे जीवांचे विशेषीकरण हे स्वरूप आणि कार्याच्या उत्क्रांतीचे एक प्रमुख कारण आहे. उदाहरणार्थ, व्हेल, डास, वाघ आणि शार्क यांच्या तोंडाच्या भागांमध्ये आणि दातांच्या आकारातील फरक किंवा पक्ष्यांमधील चोचीचे वेगळे प्रकार, जसे की हॉक्स, वुडपेकर, पेलिकन, हमिंगबर्ड्स आणि पोपट यांच्यातील फरक हे अनुकूलनाचे परिणाम आहेत. या प्राण्यांच्या विविध प्रकारचे खाणे.
  • अंतर्ग्रहण- अंतर्ग्रहण ही अन्न घेण्याची प्रक्रिया आहे.
  • पचन- या प्रक्रियेत अन्नाचे मोठे कण लहान, पाण्यात विरघळणाऱ्या कणांमध्ये मोडतात. अन्न पचवण्यासाठी भौतिक किंवा रासायनिक प्रक्रिया असतात.
  • शोषण- पचन झालेले अन्न आतड्याच्या भिंतीद्वारे रक्तप्रवाहात शोषले जाते.
  • आत्मसात करणे- शोषलेले अन्न शरीराच्या पेशींची ऊर्जा, वाढ आणि दुरुस्तीसाठी वापरले जाते.
  • उत्सर्जन- न पचलेले अन्न विष्ठेच्या स्वरूपात शरीरातून बाहेर काढले जाते. ही प्रक्रिया उत्सर्जन म्हणून ओळखली जाते.

त्यामुळे हे उत्तर आहे.

#SPJ3

Similar questions