Hindi, asked by swetadhawane, 4 months ago

प्र
प्रश्न २. भौगोलिक कारणे सांगा
(१) भरती-ओहोटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त
परिणाम होतो.
(२) काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सखल
प्रदेश खाजणाचा किंवा दलदलीचा बनतो.
(३) ओहोटीच्या ठिकाणाच्या विरुद्ध
रेखावृत्तावरदेखील ओहोटीच येते.​

Answers

Answered by morevaishnavi168
5

Answer:

(१) सूर्यापिक्षा चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आहे. (२) त्यामुळे भरती-ओहोटीच्या बाबतीत चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त परिणामकारकरीत्या कार्य करते. म्हणून भरती-ओहोटीवर सूर्यपिक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो.

2)१) काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सखल प्रदेशात भरतीमुळे सागराचे पाणी येते. (२) त्यामुळे सखल भागात काही प्रमाणात समुद्राच्या पाण्याचे व वाळूचे संचयन होत जाते. (३) अशा भागात तिवराची वने झपाट्याने वाढतात. (४) अशा भागात किनारी भागांतील जैवविविधता विकसित होऊन तिचे जतन होते. त्यामुळे काही ठिकाणी किनान्याजवळील सखल प्रदेश खाजणाचा किंवा दलदलीचा बनतो.

3) (१) जेव्हा एखादया रेखावृत्तावरील विशिष्ट ठिकाण चंद्रासमोर येते, तेव्हा त्या ठिकाणी चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलाचा प्रभाव हा केंद्रोत्सारी बलाच्या मानाने अधिक असतो. त्यामुळे तेथे चंद्राच्या दिशेने पाणी खेचले जाते व तेथे भरती येते. (२) भरतीमुळे या रेखावृत्ताशी काटकोनात असलेल्या समोरासमोरील दोन रेखावृत्तांवरील पाणी ओसरते व त्याच वेळी तेथे ओहोटी येते. अशा प्रकारे ओहोटीच्या ठिकाणच्या विरुद्ध रेखावृत्तावरदेखील (प्रतिपादी स्थानावर) ओहोटीच येते.

Explanation:

mark as brilliant if answer is correct

Similar questions