प्र. ७. पावसाळ्यातील तुमचा अनुभव सांगा.
Answers
Answer:
नेमेची येतो मग पावसाळा ,सृष्टीचे हे कौतूक जाण बाळा। अशी एक कविता माझ्या वाचनात आली होती.पहिला पाउस हा मला माझ्या बालपणीच्या गोड व सुंदर अशा आठवणीनां उजाळा देतो.माझ्या मामाचा गाव हरकुळ खुर्द भटवाडी.कणकवली तालुक्यातले हे गांव ,करवंदीच्या झाळक्यांनी संपन्न असे आहे.अशा रम्य गावांतला पहिला पाऊस मला आठवतो .कारणही तसंच आहे. माझे बाबा व आई जवळच्याच ओटव ह्या गावी जात होते.व अचानक हा पहिला पाऊस आला व एकच हरण छाप छत्रीत आम्ही तिघेजणं निघालो.जेमतेम कोठ्यापर्यत आम्ही पोहोचलो होतो तोच मोठा पाऊस सुरु झाला.व माझ्या बाबांचा राग अनावर झाला.त्यानींसरळ छत्री जोराने समोरच्या मातीच्या रस्त्यावर आदळली .सगळी जणं भिजलो.व मागे परत मामाच्या गावी परतलो.सगळी कडे सामसूम होते.बाबाना सगळेच घाबरायचे.परत कां आलात? असा प्रश्न विचारण्याचे धाडस मामाकडेही नव्हते.
पावसाळा हा सुखद ऋतू आहे. मला पावसाळा खूप आवडतो. पावसाळ्यातील अनुभव सांगायचे म्हटले की पहिला पाऊस आठवतो. आंबलेल्या मातीचा मंद सुगंध सर्वत्र दरवळतो. उन्हाळ्यात तहानलेल्या झाडांना पाणी मिळते. पावसाळ्यात सगळीकडे हिरवळ असते. नद्या, तलाव, नाले पाण्याने भरून वाहत आहेत.
लहानपणी एक अनुभव आठवतो. मी लहान असताना गावसेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माझ्या गावात पावसात जायचो. गाव सेवेला नदी आहे. त्या नदीच्या काठी बसल्यावर मला एक अतिशय सुंदर इंद्रधनुष्य दिसले आणि बाबांनी सांगितले की आपल्याला इंद्रधनुष्य का दिसते. आम्हालाही मोराची हाक ऐकू आली.
खरंच! पावसाळा हा माझ्यासाठी आतापर्यंतचा सर्वोत्तम ऋतू आहे.