प्र.१६) पर्सनॅलिटी हा शब्द ……...या लॅटिन भाषेतील शब्दापासून तयार झाला आहे
Answers
Answer:
Explanation:
व्यक्तिमत्त्व : (पर्सनॅलिटी). ‘व्यक्तिमत्त्व’ या पदास समानार्थक असलेला इंग्रजी शब्द ‘पर्सनॅलिटी’ हा लॅटिन भाषेतील ‘पर्सोना’ या शब्दावरून आलेला आहे. ‘पर्सोना’ म्हणजे मुखवटा. प्राचीन काळी ग्रीक-रोमन नाटकांतील पात्रे आपापल्या भूमिकेशी सुसंगत असे मुखवटे धारण करीत. त्यानुसार ‘व्यक्तिमत्त्व’ म्हणजे ‘व्यक्तीचे दर्शनी स्वरूप’ असा व्युप्तत्त्यर्थ निष्पन्न होतो. व्यक्तिमत्त्वाच्या या दर्शनी मुखवट्यामागे काही वेगळे लपलेले असण्याची शक्यता आहे, असेही त्या पदाने सुचविले जाते.
अमेरिकन मानसशास्त्रज्ञ ⇨ गॉर्डन विलर्ड ऑल्पोर्ट यांनी व्यक्तिमत्त्व या पदाच्या ५० व्याख्या विविध ग्रंथांमधून गोळा केलेल्या आहेत. त्यांतल्या काही व्याख्या व्यक्तीच्या बाह्य रूपावर भर देणाऱ्या आहेत काही तिच्या प्रधान वैशिष्ट्यांवर भर देणाऱ्या आहेत तर काही व्यक्तिमत्त्वाच्या केंद्रस्थानी असलेल्या ‘स्वत्वा’च्या संकल्पनेवर भर देणाऱ्या आहेत.
ऑल्पोर्ट यांची व्यक्तिमत्त्वाची व्याख्या पुढीलप्रमाणे आहे : ‘व्यक्तिमत्त्व म्हणजे व्यक्तीचे वैशिष्ट्यपूर्ण आचार-विचार तथा वर्तनव्यवहार निर्धारित करणारे, तिच्या मनोदैहिक संस्थांचे गतिशील संघटन होय’ या व्याख्येनुसार (१) व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वात, शारीरिक गुणधर्मांसोबत मानसिक वैशिष्ट्यांचाही अंतर्भाव होतो. (२) शारीरिक वैशिष्ट्ये आणि मानसिक वैशिष्ट्ये ही परस्परांशी निगडित असून त्यांचा परस्परांवर प्रभाव पडत असतो. (३) व्यक्तिमत्त्वात अभिप्रेत असलेले मनोदैहिक गुणधर्मांचे संघटन हे गतिशील असते. म्हणजेच व्यक्तिमत्त्व हे नित्य-परिवर्तनीय व विकसनशील असते.
व्यक्तिमत्त्वाची नियंत्रके : व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वास त्याचे वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप पिंडगत तसेच परिसरीय घटकांमुळे प्राप्त होते. व्यक्तिमत्त्व कोणालाही जन्मत:च पूर्णावस्थेत प्राप्त होत नसते. ते सतत विकसित होत असते. व्यक्तिमत्त्वामधील विविध गुणच्छटा विकसित होत असतात. व्यक्तिमत्त्वाचा आणि त्यातील गुणच्छटांचा विकास हा अनुवंश आणि आसमंत या दोहोंच्या संयुक्त प्रभावानुसार घडून येतो. शरीरातील अवयवांची रचना, रासायनिक प्रक्रिया, कौटुंबिक वातावरण तसेच सामाजिक परिसर, व्यक्तीला वेळोवेळी धारण कराव्या लागणाऱ्या भूमिका तसेच तिच्या डोळ्यांपुढील आदर्श या सर्वांचा व्यक्तिमत्त्वविकासावर प्रभाव पडत असतो. वाढत्या वयात मूल हे नातेवाइकांच्या, शेजार्यांदच्या, समवयस्कांच्या, शालेय सवंगड्यांच्या, शिक्षकादींच्या संपर्कात येते. त्या-त्या वेळी त्याला येणाऱ्या अनुभवांनी त्याच्या व्यक्तिमत्त्वाला बरेवाईट वळण लागत जाते.
व्यक्तिमत्त्वाच्या गुणच्छटा : (ट्रेट्स). जो गुणधर्म अथवा वर्तनविशेष एखादा मनुष्य विविध प्रसंगांत सातत्याने व सवयीनुसार प्रदर्शित करतो, त्या गुणधर्मास व्यक्तिमत्त्वाचा पैलू अथवा गुणच्छटा असे म्हणतात. जर माणूस एखाददुसऱ्या प्रसंगी संतापला, तर तेवढ्यावरून आपण त्याला ‘तापट’ अथवा ‘रागीट’ स्वभावाचा ठरवीत नाही परंतु तो जर वारंवार क्षुल्लक कारणांवरून संतापू लागला, तर मात्र तो संतापी, तापट, चिडखोर स्वभावाचा आहे, असे आपण म्हणतो. म्हणजेच तापट स्वभाव हा त्याच व्यक्तिमत्त्वाचा एक पैलू आहे, असे आपण ठरवितो. व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व म्हणजे अशा पैलूंचा, गुणच्छटांचा समुच्चय होय.
तथापि व्यक्तिमत्त्व म्हणजे विविध गुणच्छटांची केवळ गोळाबेरीज नव्हे. व्यक्तिमत्त्वात या पैलूंची अनन्यसाधारण गुंफण होत असते व ती व्यक्तिपरत्वे अनन्यसाधारण असते. प्रत्येक व्यक्तीच्या ठायी काहीएक वैशिष्ट्यपूर्ण एकात्मता असते.
विविध गुणच्छटा व्यक्तीला येणाऱ्या विविध अनुभवांनी, सामाजिक आंतरक्रियांद्वारे, तसेच अनुवंश आणि आसमंत या दोहोंच्या संयुक्त प्रभावाने विकसित होत जातात.
प्रत्येक गुणच्छटा तिच्या विशुद्ध स्वरूपात एक टोकाची वर्तनप्रवृत्ती असते. सामान्यत: माणसांच्या ठायी दोन परस्परविरोधी गुणच्छटा एकत्र नांदतात. म्हणजेच, व्यक्तिमत्त्वात परस्परविरोधी गुणच्छटांची सरमिसळ होते. उदा. प्रत्येक व्यक्ती अंशत: विवेकशील व अंशत: भावनाप्रवण असते. गुणच्छटांची अशी सरमिसळ त्यांच्या विशुद्ध स्वरूपातील आत्यंतिकता सौम्य करते.
जी. डब्ल्यू. ऑल्पोर्ट आणि एच. एस. ओडबर्ट या मानसशास्त्रज्ञ-द्वयांनी प्राथमिक गुणच्छटा आणि त्यांच्या विरोधी गुणच्छटा यांच्या बारा जोड्या दिलेल्या आहेत :