प्र. २) पत्रलेखन : विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेतील विद्यार्थ्यांच्या सायकली ठेवण्याची जागा अपुरी पडत आहे. त्याकरिता अतिरिक्त जागा उपलब्ध करण्याची मागणी करणारे पत्र मुख्यध्यपकांना लिहा
Answers
hope fully answer to get solve your problems
पत्र लेखन.
Explanation:
विद्यार्थ्यांच्या सायकलींसाठी अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्याबाबत मुख्याध्यापकांना पत्र:
प्रति,
माननीय मुख्याध्यापक,
लक्ष्मीदीप विद्यालय,
पुणे.
विषय: विद्यार्थ्यांच्या सायकलींसाठी अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्याबाबत.
सन्माननीय महोदय,
मी, समीर पाटील, आपल्या शाळेत इयत्ता आठवी- ब या वर्गात शिकत असून विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने हे पत्र लिहत आहे. हे पत्र लिहिण्यामागचे कारण की आपल्या शाळेत सायकलने येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे.
त्यामुळे, सायकली ठेवण्यासाठी जागा अपूरी पडत आहे. म्हणून, विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे व काही विद्यार्थ्यांना सायकल शाळेच्या बाहेर ठेवावी लागते.
कृपया करून तुम्ही विद्यार्थ्यांना सायकली ठेवण्यासाठी अतिरिक्त जागा उपलब्ध करून द्यावी ही नम्र विनंती.
तसदीबद्दल क्षमस्व.
आपला आज्ञाधारी विद्यार्थी,
समीर पाटील,
इयत्ता आठवी- ब.
(विद्यार्थी प्रतिनिधी)
दिनांक : २ ऑक्टोबर, २०२१.