Hindi, asked by ayushyadav8484, 6 months ago

प्र.३. स्वमत.
(अ) 'बिनभिंतीची शाळा, लाखो इथले गुरु', हा विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
(आ) 'दुसऱ्यासाठी घाव सोसणे', या ओळीतील तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.​

Answers

Answered by deepalmsableyahoocom
12

Answer:

Hope It Will Help You

Attachments:
Answered by Pinkmind
0

Answer:

(अ) 'बिनभिंतीची शाळा, लाखो इथले गुरु', हा विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

निसर्ग ही एक मोठी शाळा आहे. त्याला भिंती नाहीत. बसायला बाक नाही की शाळेची घंटा ही येथे नाही. शिक्षक म्हणजे निसर्ग व निसर्गातील प्रत्येक घटक. तेच माणसाला अनेक गोष्टी शिकवून जातात. निसर्गातील लहानशा अशा मुंगीकडून एकाच रांगेने शिस्तीने जाण्याचे धडे घेता येतात. मधमाशीकडून सतत कार्यशील राहण्याचा धडा गिरवता येतो.

झाडाकडून स्थितप्रज्ञता शिकता येते. कोणत्याही कठीण काळात नेटाने उभे राहणारे झाड आपले 'गुरु' होतात. नदीकडून अव्याहतपणे काम करण्याची प्रेरणा मिळते. नदी कधी थांबत नाही. प्रवाहशील असते. फुलांकडून सुगंध देणे म्हणजेच इतरांना सुखी कसे करावे, हे शिकता येते. पाण्याकडून निर्मळता शिकता येते.

खरोखरच निसर्ग आपला गुरु आहे आणि असे हे बिनभिंतीच्या शाळेतले गुरु आपल्याला खूप गोष्टी शिकवतात.

(आ) 'दुसऱ्यासाठी घाव सोसणे', या ओळीतील तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.

घाव सोसणे म्हणजे अतिशय वेदना सहन करणे. वृक्ष याचे उत्तम उदाहरण आहे. वृक्ष थंडी, ऊन, वारा, पाऊस यांच्याशी सामना करून प्रतिकूल परिस्थितीतही नेटाने उभे असतात. वाटसरूंना सावली देतात. स्वतः मात्र उन्हात तापत असतात. कोणी झाडावर दगड मारले, फांदया छाटल्या, घाव घातले तरी मुकाट्याने सहन करतात व आपली रसाळ फळेही देतात. माणसाने झाडाच्या लाकडाचा बांधकाम, फर्निचरसाठी उपयोग करून घेताना त्याच्यावर निर्दयीपणे करवत चालविली तरी ते झाड दुसऱ्यासाठी घाव सोसते, त्याला मदतच करते.

स्वतः त्रास सहन करून दुसऱ्याला मदत करणारे झाड खऱ्या अर्थाने ऋषीमुनींसारखे स्थितप्रज्ञ आहे.

Similar questions