प्र. ३. 'सर्वच प्राणी माणसाच्या प्रेमासाठी भुकेलेले असतात', हे विधान पाठाधारे पटवून दया
Answers
मुके प्राणी हे माणसाच्या प्रेमासाठी नेहमीच भुकेलेले असतात. माणसांनी गोंजारलेले, मिशा, डोक्यावरुन फिरवलेला मायेचा हात त्यांना नेहमीच हवा असतो. त्या क्रियेतून, भावनेतून प्रकट झालेली माया, आर्जवता, प्रेम हे प्राण्यांना कळत असते. लेखिकेचे मांजरांना खाजवणे, कुरवाळणे या ममतेच्या स्पर्शानी मांजरे खूश होऊन पोटातून ‘गुर्रगुर्र’ असा आवाज काढून समाधानाची पावती देतात.प्राण्यांना प्रेमाने जवळ घेतले की ती आपली होतात. माणसांपेक्षाही अधिक लळा लावतात. प्राण्यांमध्येही एक लहान मूल, बालकत्व असते. ती प्रेमाची, मायेची भूकलेली असतात. त्यांच्या डोळ्यातही एक अफाट कारुण्य असतं. त्याची जाणीव माणसाला व्हायला पाहिजे व मुक्या प्राण्यांवर प्रेम केले पाहिजे.
Answer:
'सर्वच प्राणी माणसाच्या प्रेमासाठी भुकलेले असतात.' हे विधान पाठाधारे पटवून दया.
उत्तर : लेखिका प्राण्यांच्या इस्पितळात गेल्या होत्या. जेव्हा त्या मांजरांच्या विभागात गेल्या तेव्हा खोलीतील सर्व मांजरे कलकलाट करू लागली. त्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न प्रत्येक मांजर करू लागले. लेखिकेंने जाळीतून बोट घालून त्यांना खाजवले, कुरवाळले तेव्हा मांजरांचे समाधान झाले. यातून मांजरे माणसाच्या प्रेमाची भुकेली होती, हे कळून येते. लेखिका परत फिरल्या तेव्हा मांजरे खिन्न झाली. इस्पितळात मांजरांना एकटेपणा वाटत असावा. एका जन्मापासून आंधळ्या मांजरीला लेखिकेंने प्रेमाने कुरवाळले व थोपटले, तशी ती प्रेमाने गुर्रगुर्र करू लागली. या सर्व प्रसंगांतून असा निष्कर्ष निघतो की, सर्वच प्राणी माणसाच्या प्रेमासाठी भुकेलेले असतात.
.
.
.
हे उत्तर तुम्हाला मदत करेल. ☺️