History, asked by anana4055, 1 day ago

पोर्तुगिजांचा युद्धनीती. टीपा

Answers

Answered by diptichhetrib
2

पोर्तुगीजांच्या भारतातील व्यापारी मोहिमा या पोर्तुगालने भारतात व्यापार करण्यासाठी इ.स. १४९७ सालापासून काढलेल्या मोहिमा होत.इ.स. १४९७ साली पोर्तुगालचा राजा इमॅन्युअलने आफ्रिका खंडाला प्रदक्षिणा घालण्याची मोहिम आखली. या मोहिमेची जबाबदारी त्याने पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को द गामा याच्यावर सोपवली. चार जहाजे आणि एकशे सत्तर प्रशिक्षित खलाशी घेऊन वास्को द गामा मोहिमेवर निघाला. आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याने दक्षिणेच्या टोकापर्यंत तो गेला. या दक्षिणेकडील शेवटच्या टोकाला त्याने 'केप ऑफ स्टॉर्म्स'[श १] असे नाव दिले. पुढे पोर्तुगालने ते बदलून 'केप ऑफ गुड होप'[श २] असे केले. त्यानंतर वास्को द गामा आफ्रिकेच्या पूर्व किनार्याने मोझांबिक येथे आला. त्यावेळी मोझांबिक हे प्रगत बंदर होते व तिथे मिलिंद या राजाचे शासन होते. या बंदरात वास्को द गामाला काही भारतीय जहाजे नांगरलेली दिसली. त्या जहाजावरील अब्दुल माजिद नावाच्या एका भारतीय खलाशाची मदत घेऊन अरबी समुद्रातून प्रवास करीत वास्को द गामा भारताच्या मलबार किनाऱ्यावर पोहोचला. कालिकतपासून उत्तरेला सोळा किलोमीटर अंतरावर असलेल्या कप्पड[टीप १] या लहानशा खेड्यात त्याने १७ मे, इ.स. १४९८ रोजी नांगर टाकला व त्यानंतर तीन दिवसांनी तो त्याची जहाजे घेऊन कालिकत बंदरात आला. या मोहिमेमुळे युरोपकडून भारताकडे थेट येणाऱ्या नवीन सागरी मार्गाचा शोध पोर्तुगालच्या या दर्यावर्दीने लावला.

Similar questions