English, asked by devatarde, 6 months ago

प्र. ४. तुमच्या शब्दांत माहिती लिहा
(अ) वरंधा घाटातील निसर्गाचे विहंगम दृश्य तुमच्या शब्दात वर्णन करा.
(आ) कावळ्या किल्ला.​

Answers

Answered by rematgujjar14
37

Answer:

(अ) वरंधा घाटातील निसर्गाचे विहंगम दृश्य तुमच्या शब्दात वर्णन करा.

Answer:

पावसाळ्यात वरंधा घाटातील निसर्गसौंदर्य मनोहारी असते . पाण्यावर हिरवीगर्द झाडी झुकलेली असते . त्यातून धबधबे रोरावत बाहेर पडतात . दरीमध्ये जिकडेतिकडे हिरवळ फुललेली असते . डोंगराला ढग बिलगलेले असल्यामुळे ते ढगाळलेले असतात . पाऊस सतत पडत असतो . मोठमोठ्या खडकांवर चाबूक मारीत पाणी खळाळत वाहत असते . हे दृश्य अतिशय विहंगम असते . डोळ्यांना खूप सुखावते . त्यातच अशा पावसाळी वातावरणात टपऱ्यांमध्ये भजी - वडे - चहा असा राजेशाही , चमचमीत मेनू प्रवाशांना खायला मिळतो .

(आ) कावळ्या किल्ला.

Answer:

जे जिगरबाज भटके आहेत , त्यांच्यासाठी कावळ्या किल्ला सदैव तयार आहे , असे लेखकांनी म्हटले आहे . वरंधा घाटातला कावळ्या किल्ला फार मोठा आहे . तो फोडून घाटाचा शेवटचा टप्पा तयार केला आहे . श्रीवाघजाई मंदिराच्या वरच्या भागात डोंगरमाथ्याजवळ जो नऊ टाक्यांचा समूह आहे , तो पूर्वी कावळ्या किल्ल्याचाच एक भाग होता इथून खाली उतरले की डांबरी रस्ता लागतो . त्याच्या उजव्या हाताच्या वळणावर कावळ्या किल्ल्याकडे जाणारी अप्रतिम सुंदर छोटी पायवाट आहे . वरती डोंगराच्या सोंडेवर पोहोचता येते . डोंगरधारेच्या कड्यावरून जाणारी जी अरुंद पायवाट एका सपाटीवर उतरते ; तेथून शेवटचे चढण चढले की त्यावरून वरंधा घाटाचे सुरेख दर्शन होते .

Similar questions
Math, 3 months ago