पुरातत्व
वंशावळीचा अभ्यास
हस्तलिखितांचा अभ्यास
इतिहास
संशोधनास
साहाय्यभूत
होणाऱ्या
नाणकशास्त्र
अक्षरवटिका शास्त्र
ज्ञानशाखा
Answers
Explanation:
संपादन करा
दुर्मिळ नाण्यांचा संग्रह करून नाण्यांच्या सर्वसमावेशक अभ्यास करणाऱ्या शास्त्राला नाणकशास्त्र (Numismatists) म्हणतात. प्राप्त झालेल्या नाण्यांचा अभ्यास करीत असताना ऐतिहासिक शक्यतांची पडताळणी केली जाते आणि मग निष्कर्ष काढले जातात. नाण्यांच्या प्रदर्शनातून संबंधित कालखंडाची वैशिष्ट्ये सांगता येतात व आजच्या कालखंडाशी त्या त्या काळातील नाण्यांच्या आधारे तुलनात्मक विवेचन करता येते.
वस्तू विनिमया द्वारे धनाची देवाणघेवाण करताना येणाऱ्या अडचणींमुळे नाणी हे चलन वापरात आले. पूर्वी कवड्या, शंख, मणी अश्या अनेक गोष्टी पैसा म्हणून वापरल्या जायच्या. धातूंच्या शोधानंतर धातूंच्या चकत्या बनवून त्यावर तत्कालीन राजाचे चिन्ह कोरणे किंवा छापणे त्याचा वापर व्यापारासाठी नाण्याच्या रुपात होऊ लागला.
नाण्यांतून तत्कालीन संस्कृतीची ओळख मिळू शकते. त्या त्या वेळी समाजात महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टी, प्रभावी व्यक्ती, महत्त्वपूर्ण घटना नाण्यांवर कोरल्या जातात. यामुळे नाणी ही इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी मोलाची ठरतात.