Hindi, asked by aryan2993, 5 months ago

प्र.१.दिलेले परिच्छेद वाचून खालील प्रश्नांचे उत्तर लिहा.
वैशाख महिन्यातलं ऊन करपवून टाकणारं असायचं. आम्ही गावातली सगळी मुलं नदीच्या
डोहात जाऊन पडायचो. अंगात गारवा भरला, की पुन्हा काठावर येऊन बसायचं. काठालगत खूप
खडक होते. पाण्याच्या प्रवाहामुळं गुळगुळीत, सपाट झालेले, लांबरुंद पसरलेले. आम्हांला तिथंच
आमचा 'कॅनव्हास' सापडला. या भल्या थोरल्या खडकावर मनसोक्त चित्रं काढता येणार होती;
पण कशानं काढणार? तोही मार्ग सापडला. आमच्या त्या भागात तांबूस रंगाचा मुरूम
असतो.
|शिवाय पि वळट रंगाचे दगडही सापडतात. ते दगड आपटले, की त्याची पिवळी पिवळी फक्की
पडते. अगदी पिठासारखी असते. हवं तसं पाणी घातलं, की पिवळा रंग तयार। मुरुमाचा खडा
ओला करून घेतला आणि खडकावर चित्रं रेखाटणं सुरू झालं. काय काढू आणि काय नको असं
व्हायचं. गुडघ्या वर टेकून रेष काढण्यात दंग व्हायचो. रेषा काढीत हातभर पुढे सरकल्यावर मागे
वळून पाहावं, तर रेषा वाळून लालजर्द झालेल्या असायच्या . आणखी सुरसुरी यायची, तापलेल्या
खडकावर टेकून टेकून गुडघ्या ची सालटं गेलेली लक्षातच यायची नाहीत. मग उभ्या खडकावर
चित्रं काढणं सुरू झालं. काही दिवसांनी वाटायला लागलं, की यात रंग भरावेत; पण ते कुठून
आणणार? त्या दिवसांत काटेसावर फुलते, लालभडक होते. तिच्या फुलातले पराग पाण्या त
चुरगाळले, की जांभळा रंग मिळतो. शेंदरी नावाच्या वनस्पतीच्या बोंडातल्या बिया भगवा रंग
देतात. काही पानांचा हिरवा केला. चुन्याचा पांढरा, कुंकवाचा लाल आणि दगडाचा पिवळा होताच,
बांबूची कोवळी काडी घेऊन पुढचं टोक ठेचलं, की त्याचा ब्रश व्हायचा. तहानभूक हरपून आम्ही
दगडावरची चित्रं रंगवत बसायचो, नजर जाईल तिथपर्य त चित्रंच चित्रं . थोड्या दिवसांनी पाऊस
यायचा. नदी वाहायला लागायची. आमची चित्रं नदीच्या पोटात गडप व्हायची.
मी जे काही व्यक्तिगत सांगतो आहे, ते एक उदाहरण आहे. निसर्ग किती परीनं आपल्याला
देत असतो; ते लक्षात येईल. मला इतकंच म्हणायचं आहे, की साधनं नाहीत म्हणून अडून
बसण्याचं कारण नाही. तुमच्या इच्छा तीव्र असतील तर साधनांशिवाय साधना करता येते.

1) काय ते सांगा.
1. लेखकाचा कॅनव्हास-
2.वैशाखतील मुलांचा उद्योग -​

Answers

Answered by natille
0

Explanation:

Pls ask your question in english.

Similar questions