English, asked by Sohamdonga8354, 10 hours ago

प्र. ७. दैनंदिन जीवनात सकाळच्या वेळी तुमच्या कानावर पडणाऱ्या आवाजांचे वर्णन करा answer in marathi ​

Answers

Answered by sanskrutimisar4
0

Explanation:

here is ur answer

Attachments:
Answered by mahakulkarpooja615
2

Answer:

१. दैनंदिन जीवनात सकाळच्या वेळी उठतांना पक्ष्यांची किलबिलाट ऐकायला मिळते. ते ऐकून मनाला आनंद मिळतो.

२. आईच्या भक्तीगीतांचा आवाज ऐकायला येतो. ती सुमधुर गाणी ऐकताना प्रसन्न होऊन जाते आणि दिवसाची सुरुवात चांगली होते.

३. बाबा आणि काका वर्तमानपत्र वाचत असताना चालू घडामोडींवर चर्चा करत असतात. त्यापासून जगात काय सुरु आहे याबद्दल माहिती मिळते.

४. दादा च्या मोबाईलचा गजर वाजत असतो. त्या गजराचा आवाज म्हणजे खेडेगावात कोंबडा सकाळी जसा आरवतो आणि सगळ्यांना जागे करतो अगदी तसाच आहे.

५. घराच्या बाजूला असलेल्या बगिच्यामधून वृद्धांच्या हास्ययोग करतानाचा आवाज येतो. त्यांचा हसण्याचा आवाज ऐकून मलासुद्धा हसायला येते. त्यामुळे सकाळची सुरुवात उत्साहाने होते.

६. सकाळी शाळेत जाणाऱ्या बस आणि रिक्षाच्या हॉर्नचा आवाज येतो. त्यामुळे मला सुद्धा माझ्या शाळेची तयारी लवकर करण्याचे भान येते.

Similar questions