History, asked by ashwiniganeshbhokare, 11 months ago

(१) प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.​

Answers

Answered by varadad25
51

Answer:

प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.

Explanation:

१. प्रादेशिक इतिहासलेखन म्हणजे प्रदेशानुसार केलेले इतिहासलेखन होय.

२. इंग्रजी शिकलेल्या भारतीयांना आपल्या संस्कृतीचीइतिहासाची जाणीव झाली.

३. या आत्मजाणीव झालेल्या भारतीयांनी आपल्या राष्ट्रासाठी इतिहासलेखन केले. याला राष्ट्रवादी इतिहासलेखन म्हणतात.

४. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारताचा इतिहास हा पूर्वग्रहदूषित ( चूक ) दृष्टिकोनातून लिहिला होता.

५. भारतातील विविध प्रदेशातील इतिहासकारांनी या इतिहासलेखनाला विरोध केला.

६. या इतिहासकारांनी आपल्या प्रदेशातील वैशिष्ट्यांकडे लक्ष दिले व इतिहासलेखन केले.

७. राष्ट्रवादी इतिहासलेखनाचा प्रभाव होताच.

त्यातूनच, प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.

Answered by sandipsagare8588
2

Answer:

प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली

Explanation:

१] इंग्रजी शिक्षणाने भारतीयांत निर्माण झालेल्या आत्मजाविणेने राष्ट्रवादी इतिहासलेखनास प्रवृत्त केले .  

२] ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला भारताच्या विविध प्रांतातील इतिहासलेखकांनी विरोध केला .  

३] आपल्या प्रादेशिक वैशिष्ट्याकडे इतिहासकारांचे लक्ष वेधले गेले .  

४] राष्ट्रवादी इतिहासलेखनाचा प्रभाव होताच , त्यातूनच प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली .

Similar questions