History, asked by shivamkshisagaraanki, 4 days ago

प्रादेशिक संघटनांचा संक्षिप्त आढावा द्या ​

Answers

Answered by man18deep62
0

Answer:

. सार्क (SAARC) :-

सप्टेंबर 1983 मध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश, मालदिव, नेपाळ, श्रीलंका व भूतान या सात देशांच्या परराष्ट्र मंत्र्याची बैठक नवी दिल्ली येथे भरली होती.

या बैठकीतमध्ये सार्क संघटनेची स्थापना करण्यात आली. नुकते अफगाणीस्थानला सुद्धा या संघटनेचा आठवा सदस्य म्हणून मान्यता दिली आहे.

स्थापना :सप्टेंबर 1983

उद्देश :

सर्व राष्ट्रांच्या एकमताने या संघटनेची खालील उद्दिष्टे ठरविण्यात आली.

 

दक्षिण आशियाई क्षेत्रातील लोकांच्या जीवनामध्ये सुधारणा घडवून आणणे.

 

 

दक्षिण आशियाई प्रदेशातील आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक सुधारणा करणे.

 

 

या प्रदेशातील देशांमध्ये सामूहिकरित्या स्वावलंबनाची प्रक्रिया वृदिंगत करणे.

 

 

सदस्य राष्ट्रांमध्ये आर्थिक, सामाजिक, तांत्रिक, वैज्ञानिक क्षेत्रात परस्परांना सहकार्य करणे.

 

दक्षिण आशियाई संघटनेतील समान हित संबंधाबाबत आंतरराष्ट्रीय व्यासपिठावर सहकार्य करणे.

बैठक : या संघटनेची बैठक दरवर्षी बोलाविण्यात येते.

2. साप्ता (SAFTA) :- 

मे 1995 मध्ये सार्क सदस्य राष्ट्रांची बैठक दिल्ली येथे भरली होती. भारताचे पंतप्रधान नरसिंहराव हे या बैठकीचे अध्यक्ष होते.

या बैठकीमध्ये अध्यक्षीय पासदावरून बोलतांना नरसिंहराव यांनी जगातील बदलत्या आर्थिक परिस्थितीची कल लक्षात घेता सार्क देशा अंतर्गत आर्थिक समुदाय स्थापन करण्याची संकल्पना मांडली. या संकल्पानेला सदस्य राष्ट्रांनी मान्यता दिली.

या बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयानुसार सार्क प्राधान्यकृत व्यापार करार या संघटनेची स्थापना करण्यात आली.

डिसेंबर 1995 पासून साप्ताच्या कामकाजाला सुरुवात झाली.

साप्ता कराराअंतर्गत सदस्य राष्ट्रांनी एकूण 226 वस्तूंच्या जकाती विषयक निर्णय घेण्यात आले.

या कराअंतर्गत सन 2000 पर्यंत सदस्य राष्ट्रामध्ये व्यापार खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

3. राष्ट्रकुल परिषद (COMMONWEALTH) :

ब्रिटनच्या वसाहतीखाली असलेल्या राष्ट्रांची राष्ट्रकुल ही संघटना स्थापन करण्यात आली. ब्रिटनची राणी या संघटनेची कायम स्वरूपी अध्यक्ष आहे. या संघटनेची दर दोन वर्षानी बैठक बोलाविण्यात येते.

या बैठकीमध्ये सदस्य राष्ट्रांच्या आर्थिक, राजकीय प्रश्नावर चर्चा करण्यात येते.

स्थापना : 1926

मुख्यालय : लंडन

सदस्य राष्ट्रे : 53

4. यूरोपियन आर्थिक समुदाय :

युरोप खंडात येणार्‍या राष्ट्रांमध्ये व्यापर व्यवसाय वाढीला लावणे आणि जकात विषयक धोरण निश्चित करण्याच्या उद्देशाने ही संघटना स्थापन करण्यात आली आहे.

स्थापना : 1958

मुख्यालय : ब्रूसेल्स (बेल्जियम)

सभासद राष्ट्र : युरोप खंडातील बेल्जियम, जर्मनी, पोर्तुगीज, नेदरलँड, इंग्लंड, ग्रीस, लॅक्झेबर्ग, डेन्मार्क, स्वीडन, इटली, आयर्लंड, फिनलँड, फ्रान्स, स्पेन व ऑस्ट्रिया असे एकूण 15 राष्ट्र सदस्य आहेत.

5. ओपेक (OPEC) :

तेल उत्पादन करणारे राष्ट्र या संघटनेचे सदस्य असून जागतिक तेल उत्पादनाच्या किंमती या संघटनेव्दारे नियंत्रीत केल्या जातात.

स्थापना : 14 नोव्हेंबर 1960 (बगदाद)

मुख्य कार्यालय : व्हिएन्ना (ऑस्ट्रिया)

एकूण सदस्य : 18

उद्देश : खनिज तेल निर्माण करणार्‍या राष्ट्रांचे हितसंबंध जपणे.

6. एशियन (ASEAN) :

दक्षिण पूर्व आशिया खंडात येणार्‍या राष्ट्रामध्ये आर्थिक सुधारणा घडवून आणणे व स्थैर्य प्राप्त करण्याच्या उद्देशाने ही संघटना स्थापन करण्यात आली आहे.

स्थापना : 8 ऑगस्ट 1967

मुख्यालय : जकार्ता (इंडोनेशिया)

7. आशियाई विकास बँक :

जपान, अमेरिका, भारत व इंग्लंड संस्थापक राष्ट्रांनी ही बँक स्थापन केली आहे.

स्थापना : 1966

मुख्यालय : मनिला (फिलिपाईन्स

Explanation:

this may help you

plss mark me as brainlist plss

Similar questions