Art, asked by like19, 12 hours ago

१) प्रायोगिक संशोधन पद्धती विषयी माहिती लिहा.BA/bcom​

Answers

Answered by likefreefire1
2

प्रायोगिक संशोधन

(Experimental Researchy

कार्य-कारण संबंध स्पष्ट करण्यासाठी 'प्रयोग' हा एकमेव मार्ग उपलब्ध आहे. प्रयोगामध्ये एका घटकात प्रयोगकर्ता हेतुपुरस्सर काही बदल करतो आणि या बदलांचा इतर घटकांवर काय परिणाम होतो, हे तपासून पाहतो. त्यासाठी प्रथम तो परिस्थितीचा अभ्यास करायचा आहे, ती परिस्थिती निर्माण करतो, त्यातील घटकांमध्ये बदल करतो आणि या बदलाच्या परिणामांचे निरीक्षण करतो. हे आपण एका उदाहरणाद्वारे समजून

समजा, एखाद्या शामकाचा (tranquilizer) वर्तनावर काय परिणाम होतो हे प्रयोगकर्त्याला जाणून घ्यावयाचे असल्यास प्रयोगशाळेत, स्वतःच्या निरीक्षणाखाली प्रयुक्तांच्या एका गटाला शामक देईल व दुसऱ्या गटाला देणार नाही. नंतर तो दोन्ही गटांतील प्रयुक्तांच्या वर्तनाची तुलना करील. याप्रमाणे विशिष्ट शामकाचा वर्तनावर होणारा परिणाम यांचा तो अभ्यास करेल. थोडक्यात, आपणास असे म्हणता येईल की, प्रायोगिक पद्धतीत प्रयोगकर्ता (१) काही घटकांत परिवर्तन घडवतो, (२) काही घटकांवर नियंत्रण ठेवून ते स्थिर ठेवतो व (३) परिवर्तित घटकांवरच्या परिणामांचा आढावा घेतो. अर्थात कोणत्या घटकांच्या परिणामांचा अभ्यास करावयाचा हे पूर्वनियोजित असते. वर्तन हे व्यक्ती आणि उद्दीपक परिस्थिती यांच्या आंतरक्रियेतून निर्माण होत असते. हे खालील समीकरणातून अधिक स्पष्ट करता येते.

R = 1 (OS)

यात R म्हणजे प्रतिक्रिया (Response) म्हणजे व्यक्ती (Organism) आणि S म्हणजे उद्दीपक (Stimulas).

ज्यामुळे प्रतिक्रिया निर्माण होते त्याला उद्दीपक असे म्हणतात. आपल्या मनातील विचार हा अंतर्गत उदीपक तर शेजाऱ्याने हाक मारणे हा बहिर्गत उद्दीपक होय. या उद्दीपकांना अनुलक्षून आपल्या प्रतिक्रिया होत असतात. त्या शाब्दिक वा कारक स्वरूपाच्या असतात.

Similar questions