प्र5) खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे 15/20 ओळीत निबंध लिहा :
1. माझी आई
Answers
Explanation:
माझी आई मला खूप खूप आवडते. माझे माझ्या आई वर खूप प्रेम आहे. मातेच्या प्रेमाला कशाची तुलना नाही . माझी आई माझे मन कधीच दु:खवत नाही. घरात आई नसली की , माझे मन घरात लागत नाही. माझी आई मला समजून घेते.ज्यांची आई नसते त्याची व्यथा जसे की, "स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ".
माझी आई एक गृहीणी आहे. घरात सर्व प्रथम आईच उठते. ती मला दररोज लवकर उठवते. मला उठवतांना ती प्रेमाने हात फिरवते. तिचा स्पर्श ,तिची येन्याची चाहूल नकळत समजते. मला चांगल्या सवयी लावते.मला शिकवते. चूकल्यावर शिक्षा करते . मी माझ्या आईमूळे यशाच्या पायरीवर पुढे चढते. त्यात यशात माझ्या आईला श्रय देते. माझी आई माझ्या साठी खूप मेहनत करते. स्वंंयंंपाक करण्यात ती कुुशल आहे. माझे आजोबा व आजी आपल्या सूनबाईला 'अन्नपूर्णा' असे संबोधून सतत कौतुक करत असतात.
आईचे कृपाछत्र एवढे विशाल आहे, हे उपकार एवढे अमाप आहेत की शंभर वेळा जन्मूनही ते फिटणार नाहीत. जननी हे दैवत असे असामान्य आहे. त्यामुळे माझी आई माझा आदर्श आहे.
Explanation:
प्र5) खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे 15/20 ओळीत निबंध लिहा :
1. माझी आई