पूरग्रस्ताची आत्मकथा in marathi
Answers
Answer:
Mark me brainlest
कसे वाटते ना जेव्हा आपल्याच घरातून आपल्या इच्छेविरुद्ध निघावे लागले तर……असच काही तरी माझ्यासोबत घडले….मी इतकं मदतहीन झालो होतो आजी बाजूचे वातावरण पाहून इतकं नैराश्य झालं होत की बस्स………
तर मित्रांनो मी आहे राहुल देशमुख……..मी एक पूरग्रस्त आहे. मला या २-४ आठवड्यामागे इतका त्रास झाला की काय सांगू तुम्हाला. यावर्षी पाऊस इतका होता की,आम्ही सगळे पुरात अडकलो. कुठून मदत येत नव्हती, रोज शे दीडशे लोक या पुरात आपला जीव गमावू लागले.
मला असे वाटायचे की मी पण असेच एके दिवशी मरेन……पण नाही मी हिंमत केली अन् ठरवलं की स्वतःच जीव तर वाचवयचाच आहे पण लोकांना पण हिंमतीने या संकटाचा सामना करायला लावायचा होता.
माझे घर या पुरात बुडाले. सगळ्या किंमती अन् सारे सामान वाहून गेले होते. माझा लहान भाऊ पण यात वाहून गेला. या दुखामुळे माझे आईबाबा जगण्याची उमेद सोडून दिली होती.
आम्ही कसे बसे ठरवले की, मदत घेऊन यायची. मी अन् माझ्या मित्रांनी दोरी लावून पोहून जायचे ठरवले अन् मदत घेऊन यायची ठरवले होते. आम्ही कसेबसे पोहायला सुरुवात केली. पुराच्या पाण्यात गुरेढोरे, प्राणी, पाण्यात राहणारे प्राणी जसे मगरी, कासवे, मासे हे सगळे वाहून जात होते. आमच्याशी होईल तितकी मदत आम्ही करत त्या प्राण्याचा जीव वाचवत पुढे जाऊ लागलो.
शेवटी आम्हाला एक किनारा दिसला. आम्ही तिथे जाऊन मदत शोधली अन् मग आमच्या लोकांना वाचवले. सगळ्याच्या डोळ्यात एक चमक पहिली त्यावेळी……….
अशा प्रकारे आम्ही त्या संकटातून वाचलो……….
Answer:
Purgrastache Manogat: आपल्या देशात व जगभरात दरवर्षी अनेक महापूर व नैसर्गिक समस्या निर्माण होतात. या समस्यामध्ये अनेक लोक पीडित होतात. आजच्या या लेखात अश्याच एका पूरग्रस्ताचे मनोगत देण्यात आले आहे. ही पूरग्रस्तांची कैफियत व आत्मकथा तुम्हाला शाळा कॉलेज मध्ये निबंध म्हणून कमात येईल.
Explanation:
पूरग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध | Purgrastache Manogat Marathi Nibandh
मी एक पूरग्रस्त पीडित व्यक्ती आहे. खरोखर त्या रात्री मी आयुष्यातील सर्वात जास्त भीतीदायक वेळ पहिला होता. त्या दिवशी दिवसभर पाऊस सुरू होता मला वाटेल की हा नेहमी प्रमाणे सामान्य पाऊस आहे. माझे घर कच्चे असल्याने माझ्या भिंतीतून नेहमी प्रमाणे पाणी गळत होते. परंतु मी या कडे काही जास्त लक्ष दिले नाही. कारण दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात घर गळायचे, या वर्षी पाऊस थोडा जास्त होता परंतु मी त्याकडे काही खास लक्ष दिले नाही. रात्री 8-9 च्या सुमारास मी माझी पत्नी मुले आणि आई वडील जेवण करून झोपलो.
अचानक रात्रीच्या 2 वाजेच्या सुमारास जोरदार आवाजाने माझे डोळे उघडले. आवाजाने घाबरून मी बाहेर पडलो दरवाजा उघडून पाहिले तर आमच्या समोरच्याचे घर अती पावसामुळे कोसळले होते. मी खूप घाबरलो. बाहेर पाणी गुडग्याच्या वर होते. मी लवकरात लवकर घरातील सर्व सदस्यांना बाहेर काढले व आम्ही घराजवळ असलेल्या एका उंच ठिकाणी जाऊन उभे राहिलो. माझ्या कुटुंबालाही माझ्या सोबत सुरक्षित वाटत होते.
मला वाटत होते की काही वेळात पावसाचे पाणी कमी होईल. परंतु माझा अनुमान पूर्णतः चुकीचा होता. पाणी आधीपेक्षा जास्त जोरात येऊ लागले. हवाही खूप जोरात सुरू होती. आमच्या आजूबाजूचे काही घर पडून ते लोक त्याखाली दाबले गेले होते. आम्ही कसे तरी घरा बाहेर पडालो होतो. आता पावसाचे पाणी आणखीन वाढत होते, आमचे घर अर्ध्याच्या वर पावसात बुडाले होते. आणि पुन्हा एकदा जोरदार आवाज झाला व आमचे घर जमीनदोस्त झाले. घरातील सर्व सामान दाबले गेले होते.
आमच्या समोर घरातील वस्तू वाहू लागल्या परंतु आम्ही काहीही करू शकत नव्हतो. या महापुरात शहरातील 200 पेक्षा जास्त लोक मारले गेले होते. मी स्वताला व माझी कुटुंबाला भाग्यशाली समजत होतो. या प्रचंड महापुरातून आम्ही सुखरुप बाहेर पडलो होतो. परंतु आमचे सर्व धन व किमती वस्तू नष्ट झाल्या होत्या. आमच्या काही नातेवाईकांनी काही काळ आम्हाला राहायला स्थान दिले. थोडी पैश्यांची मदतही केली. शासनानेही महापूरग्रस्त लोकांना काही पैसे दिले. ज्यामुळे आम्हाला पुन्हा संसार थाटण्यासाठी मदत झाली.
या अनुभवानंतर आमच्या लक्षात आले की महापूर ग्रस्त लोकांची स्थिती कशी असते. आपल्या देशात दरवर्षी कुठे न कुठे महापुराने लोकांची घरे दरे नष्ट होतात. अश्या वेळी आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे की आपण त्यांची शक्य होईल तेवढी मदत करावी. पूरग्रस्त या लोकांची सेवा केल्याने भरपूर पुण्याची प्राप्ती होते.