Economy, asked by sumitsaha27, 14 hours ago

४ : प्रजासत्ताकदिनी निघालेल्या, एका शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रभातफेरीतील पुढील फलक पाहा आणिसूचनेनुसार कोणत्याही एका विषयावर पत्रलेखन करा :नपाम्हीकचऱ्यापासून कुबेर व्हा!नेच्याकचरा वेगवेगळा करासुका कचराओला कचराप्लास्टिक व कागद वेगळे कराखत तयार कराविका आणि पैसा मिळवापर्यावरणप्रेमी या नात्यानेत्या शाळेचे अभिनंदनकरणारे पत्र लिहा.वरी

Answers

Answered by rajraaz85
42

Answer:

अजय पाटील

अर्जुन ,गांधी मार्ग,

सातारा-४००३४५

प्रति,

माननीय मुख्याध्यापक,

आदर्श विद्यालय,

सातारा -४५

विषय: आपण केलेल्या कामाबद्दल खूप खूप अभिनंदन.

माननीय महोदय,

आपण समाजात बघतो की प्रत्येक व्यक्ती हा परिसरात झालेल्या कचऱ्याच्या साम्राज्याबद्दल टीका करत असतो. पण जर समाजातील प्रत्येक व्यक्तीने ठरवले तर परिसरात कचरा होणार नाही हे सर्वजण विसरतात.

काल रस्त्याने जात असताना प्रजासत्ताक दिनानिमित्त तुमच्या शाळेने जी प्रभात फेरी काढली होती त्यात काही विद्यार्थ्यांच्या हातात मी फलक बघितले. परिसर कसा स्वच्छ ठेवता येईल, ओला कचरा सुका कचरा कसा वेगळा करता येईल आणि कचऱ्यापासून खतही बनू शकते असा सुंदर संदेश त्या फलकातून दिलेला होता. मला तुमच्या शाळेचे खूप अभिनंदन करावेसे वाटते, कारण समाजात तुम्ही खूप छान जनजागृती करत आहात.

तुम्ही केलेली जनजागृती बघून थोड्या लोकांनी जरी धडा घेतला तरी आपला परिसर सुंदर होण्यास त्याची मदत होईल. तुम्ही अशाच प्रकारे जनजागृती करत राहा.

पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन.

तुमचा विश्वासू,

अजय पाटील

Similar questions