प्रम दिलेल्या मुड्याच्या आधारे कया लेखन करा
लोभी माणूस-भरपूर पैसा पण लोभ सुटत नाही-
राजदिवस पैशांचा विचार-रोज खाची प्रार्थना-पाजला
अजूनमीमत कर" देव म्हणतो ठिक आहेस्वरदान
सुर्य उगवल्यापासुन सुर्यास्तापर्यंत-तू जितका
द्यावशील तितकी जमीन तला खूप आजर-सकी
उठून धावणे-थकणे-मरण.
शा
Answers
Answer:
सुंदरपूर गावात रामजी नावाचा एक अत्यंत धनवान पण लोभी माणूस राहत होता. आपल्या दुकानावर येणाऱ्या प्रत्येक माणसाला ठकवणं, हे त्याचं काम होतं. त्यातून तो भरपूर धन जमा करायचा. मात्र ते धन त्याच्याकडे टिकत नसे. हे पाहून त्याची पत्नी त्याला कायम समजवायची की बेईमानीचे पैसे कधीच टिकत नाहीत. तुम्ही ईमानदारीने पैसे कमवा. पण तो मात्र बायकोचं कधीच ऐकत नसे. एकदा त्याच्या मनात विचार आला की, बायको जे म्हणते त्याची शहानिशा करून बघू. त्याने ईमानदारीने काही धन जमा केलं. त्याची एक सोन्याची अंगठी बनवली, त्यावर स्वतःचं नाव कोरलं. ती अंगठी एका कपड्यात बांधून गावातल्या एका चौकात ठेवून दिली. कुणालातरी ते कचऱ्याचं बोचकं वाटलं त्याने ते तळ्यात फेकून दिलं. ती अंगठी तळ्यातील एका माशाने गिळली.
काही दिवसांनी एका कोळ्याला जाळ्यात तोच मासा सापडला. कोळ्याने जेव्हा त्या माशाला चिरलं, तेव्हा त्याच्या पोटात ती अंगठी सापडली. त्यावर रामजीचं नावही होतं. ते पाहून त्या इमानदार कोळ्याने बक्षीसाच्या आशेने ती अंगठी रामजीकडे आणून दिली. आपली सोन्याची अंगठी मिळालेली पाहून रामजी खूश झाला. त्याला बायकोचं म्हणणं पटलं. त्याने त्या कोळ्यालाही योग्य बक्षीस दिलं. मित्रांनो, तुम्हीही लक्षात ठेवा, कष्टाचे पैसे कधीच वाया जात नाहीत आणि बेईमानीचे पैसे कधीच टिकत नाहीत.