प्रसंग लेखन अचानक पडलेला पाऊस
Answers
या दिवशी भयंकर उकडत होते . सकाळी सहा वाजतासुद्धा अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या . जसजसा दिवस वर येऊ लागला , तसतसा उकाड्याने जीव हैराण होऊ लागला . पंख्याखाली उभे राहिले तरी केसांतून , हनुवटीखालून मानेवर घामाच्या धारा वाहत होत्या . जिवाची काहिली होत होती . बसून पाहिले . उभे राहून पाहिले . टीव्ही पाहायचा प्रयत्न केला . तरीही मन तगमगत राहिले . चैनच पडत नव्हती . तेवढ्यात , भर दुपार असतानाही अंधारून आले . आभाळभर काळेकुट्ट ढग जमा झाले . जोराचा गार गार वारा सुटला .
जमिनीवरील कागदकपटे , पालापाचोळा हवेत घुसळू लागले ... आणि काही क्षणांतच टपोऱ्या थेंबांचा ताडताड वर्षाव सुरू झाला . धुवाधार पाऊस कोसळू लागला . आभाळभर पाऊसच पाऊस होता . घराशेजारी , रस्त्यावर , शेतात , डोंगरात , दरीत सर्वत्र पाण्याचे लोटच्या लोट सुसाट धावू लागले . एखादया अवखळ दांडगट मुलाप्रमाणे पाऊस हुंदडत होता . आम्ही मुलेसुद्धा त्याच्या अवखळपणात सामील झालो , मनसोक्त नाचू लागलो . खरे सांगू का ? पाऊस आणि आम्ही एकत्रच नाचत होतो हा अनुभवच वेगळा होता . एरवी असा पाऊस आला की आम्ही पटापटा घरात घुसतो . दारेखिडक्या लावून घेतो . रस्त्यावर असलो तर रेनकोट घालतो . छत्र्या उघडतो . पावसाचा फारच जोर असला तर दुकानांचा , हॉटेलांचा आसरा घेतो .
I didn't knew
So that's why I didn't write anything in this answer
Sorry