प्रसंगलेखन नमुना
खालील बातमी वाचा.
गणित ऑलिंपियाड मध्ये दापोली जिल्ह्यातील
मंगल दाबके महाराष्ट्रातून प्रथम
माननीय शिक्षणाधिकाऱ्यांच्या हस्ते मंगलचा विशेष गौरव सोहळा
शिक्षक, मुख्याध्यापक व
मान्यवरांतर्फे कौतुक
मंगलकडून शिक्षकांच्या
मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता
पालक कृतार्थ
अभिनंदनाचा वर्षाव
व शुभेच्छा
वरील सोहळ्याला तुम्ही उपस्थित होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
Answers
Answer:
मी अनुभवलेला गौरव सोहळा
एकदा मला असेच गौरव सोहळ्याला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले. खरंच आजही तो विद्यार्थी आणि त्याचे केलेले कौतुक माझ्या स्मरणात आहे. दरवर्षीप्रमाणे त्या वर्षीही भारत सरकारने गणित ओलंपियाड स्पर्धेचे आयोजन केले होते. महाराष्ट्रातील कानाकोपर्यातून अनेक विद्यार्थी या परीक्षेला बसले होते व आपल्यातील गणिताविषयी असणारी आवड व ज्ञान सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होते. मी कधीही कल्पना केली नव्हती की रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली या छोट्याशा गावातून एक विद्यार्थी या परीक्षेमध्ये महाराष्ट्रातून अव्वल येईल. असे मानले जाते की शहरातील विद्यार्थ्यांच्या तुलनेने खेड्यातील विद्यार्थी हे तेवढे प्रगत नसतात. पण मंगल दाबके या विद्यार्थ्याने आपल्या गणिताच्या ज्ञानाच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम येऊन आपण कुठे कमी नाहीत हे सिद्ध केले.
मंगल दापकेच्या त्या यशाला गौरवण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून त्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माननीय शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते मंगल चा विशेष गौरव करण्यात आला. शिक्षणाधिकारी यांनी गौरवचे कौतुक केले व इतर विद्यार्थ्यांनाही गौरव सारखे होता येईल यासाठी प्रोत्साहन दिले. माननीय शिक्षणाधिकारी यांच्या भाषणानंतर मंगल याने आपला अनुभव सर्व विद्यार्थ्यां समोर व्यक्त केला. आपल्या यशाचे सर्व श्रेय मंगलने आपल्या शिक्षकांच्या व आई-वडिलांच्या मार्गदर्शनाला दिले व त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. गणित विषयातील ज्ञान वाढवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि त्याची अभ्यासातील चिकाटी याच्या जोरावरच त्याने हे यश खेचून आणले होते. मंगल च्या गौरव सोहळ्याला शाळेतील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मंगलने फक्त शाळेचेच नाहीतर तर त्याच्या संपूर्ण गावाचे नाव मोठे केले होते. मंगल ने मिळवलेल्या यशाबद्दल त्याच्या आई-वडिलांना खूप कृतार्थ वाटत होते व मंगल चा अभिमान वाटत होता. फक्त त्याच्या गावातूनच नाही तर पूर्ण जिल्ह्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत होता. आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. हे पाहून असे लक्षात येते की जर तुमची मेहनत करण्याची तयारी असेल तर तुम्ही कुठलीही गोष्ट मिळवू शकतात.