India Languages, asked by siddheshbagul572, 1 day ago

प्रसंगलेखन

'शालेय नृत्यनाट्य स्पर्धा' पारितोषिक वितरण सोहळ्याला तुम्ही उपस्थित होता अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.​

Answers

Answered by rajraaz85
2

Answer:

आज आपण बघतो की प्रत्येक शाळा ही आपल्या विद्यार्थ्यांच्या गुण कौशल्य विकास करण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करत असते. कारण जेव्हा स्पर्धा असते, तेव्हा प्रत्येक विद्यार्थी हा आपल्यातील कलागुणांना सिद्ध करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो.

असेच विद्यार्थ्यांची कलागुण जोपासण्यासाठी सरस्वती विद्यालय मलाड यांनी नृत्य नाट्य स्पर्धेचे आयोजन केले होते. आणि त्या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले. खरतर स्पर्धा आणि त्यासाठी विद्यार्थ्यांनी घेतलेले प्रयत्न या सर्वांचे कौतुक म्हणून पारितोषिक वितरण समारंभ हा आयोजित केलेला असतो.

पारितोषिक वितरण समारंभाची सुरुवात हे सरस्वती मातेच्या व गणपती बाप्पाच्या आशिर्वादाने झाली. जसे ही पारितोषिक वितरण समारंभाला सुरुवात झाली तसतसे विद्यार्थ्यांच्या मनातील उत्साह वाढू लागला प्रत्येकाला एकच कुतूहल होते की आता पारितोषिक कोणाला मिळणार. जसजसे विद्यार्थ्यांचे नाव घेतले जात होते एका बाजूला आनंद तर दुसऱ्या बाजूला काही विद्यार्थी आपल्या चेहऱ्यावरचे दुःख लपवण्याचा प्रयत्न करत होते. पण खरं तर पारितोषिक कुणालाही मिळू पण स्पर्धा आणि त्यासाठी घेतलेले प्रयत्न हे माणसाला खूप काही शिकवून जातात त्याचा प्रत्यय आणि समाधान या दिवशी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होते.

प्रत्येक विद्यार्थी आणि त्यांच्या सोबत असणारे त्यांचे शिक्षक यांनी मागील काही दिवसापासून अतोनात मेहनत घेऊन त्या स्पर्धेत भाग घेतलेला होता.त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसत होते. अशा या पारितोषिक वितरण समारंभाला उपस्थित राहणे हा एक विलक्षण आनंद देणारा प्रसंग होता. पारितोषिक वितरण समारंभाचा शेवट हा सामूहिक गीताने झाला आणि कार्यक्रम संपला.

Similar questions