Social Sciences, asked by vaishnavi1414, 1 year ago

प्रसार माध्यमांची माहीती आणि प्रसार माध्यमातून होणारे फायदे आणि तोटे

Answers

Answered by sushantkumar5339
170


प्रसार माध्यमे आणि 

सामाजिक परिवर्तन

भारतीय स्वातंत्र्योत्तर काळानंतर भारतीय संविधानाने प्रदान केलेल्या मुलभुत हक्कापेक्षा अभिव्यक्ती स्वतंत्र्याचा लाभ होऊन एक नवी जीवनदृष्टी लाभल्यामुळे भारतीय प्रसार माध्यमांनी आपले स्थान निर्वीवाद निर्माण केले. ब्रिटीश राजवटीमध्ये भारतात गोपनियतेचा कायदा लागू केला गेला होता. या कायद्यामुळे प्रशासकीय स्तरावरील विविध प्रकारच्या माहितीपासून प्रसार माध्यमांना व नागरिकांना वंचित रहाव लागत होते. आता भारत सरकारने संपुर्ण देशात जनतेला माहितीचा अधिकार प्रदान केल्यामुळे भारतीय प्रसार माध्यमांचे स्थान आणि भारतातील नागरिकांचे मुलभूत हक्क अधिक मजबूत झाले आहेत. प्रशासकीय स्तरावरील कामकाज पुर्णःपारदर्शक करण्याबरोबरच माहिती अधिकाराच्या माध्यमातून सामुहिक विकासाच्या प्रक्रियेला गती देऊन सर्वांगीन विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी माहिती अधिकाराला प्रसार माध्यमांची जोड दिली तर सर्वांगीण विकासाचे चक्र अधिक गतीमान करता येईल व त्यातून सामुहिक विकासाचे फळ अखेरच्या घटकांपर्यंत पोहचविणे शक्य होईल. माहिती अधिकार व प्रसार माध्यमे या दोन्ही परस्पर पुरक व परस्परांशी निगडीत बाबी आहेत. प्रसार माध्यम ही प्रतिमा निमिर्ती व विचार परिवर्तनाची आणि नवी नवी माहिती प्रसारणाची महत्वाची साधनं असतात तर समाज व प्रशासन हे माध्यमांना ‘हार्ड न्युज देणारे’ असतात. दुस-या महायुद्धानंतर जगभर विकसीत झालेल्या प्रगत ज्ञान शाखापैकी विकास संवाद ही एक मौलिक शाखा आहे. या संदर्भात माध्यम तज्ञ डॉ.वि.ल.धारूरकर यांनी विकास संवादाची नवी क्षितीजे या ग्रंथात म्हटले आहे की, ‘समाजात घडत असलेले रचनात्मक बदल नोंदविणे व ते गतिमान करणे हा विकास संवादाचा आत्मा होय.’ (2)विविध क्षेत्रात प्रसार माध्यमे विकासाला पोषक वातावरण निर्माण करतात आणि अशा वातावरणातुन संस्थात्मक जीवनाचे बदलते चित्र व सामाजिक बांधिलकीची भावनाही रूजू लागते.विकसनशील राष्ट्रांमध्ये नवीन जिवनमुल्ये रूजविण्याचे काम प्रसार माध्यमे करतात.

vaishnavi1414: but it's fayde and tote
Answered by SushmitaAhluwalia
5

माध्यमांचे प्रकार म्हणजे विविध माध्यमे ज्याद्वारे माहिती आणि मनोरंजन प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. मीडियामध्ये अनेकदा सामग्रीचा समावेश होतो तसेच ते प्रसारित करण्यासाठी आवश्यक भौतिक उपकरणे, जसे की टेलिव्हिजन प्रोग्रामिंग आणि टेलिव्हिजन. तुम्ही मीडियाला चार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागू शकता:

  • मुद्रित माध्यम: मुद्रित माध्यम म्हणजे मुद्रित साहित्य, जसे की पुस्तके आणि मासिके, ज्यामध्ये शब्द आणि प्रतिमा असतात I
  • ब्रॉडकास्ट मीडिया: ब्रॉडकास्ट मीडियामध्ये टेलिव्हिजन आणि रेडिओ यांसारख्या अनेक जनसंवाद माध्यमांपैकी एकाद्वारे प्रसारित केलेली माहिती समाविष्ट असते I
  • इंटरनेट मीडिया: इंटरनेट मीडिया ही ऑनलाइन वितरीत केलेली सामग्री आहे आणि त्यात ईमेल आणि ऑनलाइन प्रकाशने समाविष्ट असू शकतात I
  • घराबाहेरील मीडिया: घराबाहेरील मीडिया हे माध्यम आहे जे लोकांपर्यंत पोहोचते जेव्हा ते त्यांच्या घराबाहेर असतात, जसे की होर्डिंग I
Similar questions