World Languages, asked by rutujanghorpade18, 1 month ago

प्रसारमाध्यमांचे महत्व मराठी निबंध

Answers

Answered by dakshitagowda
7

स्वातंत्र्यापूर्वी जुलमी पद्धतीने शासन करणा-या ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी देशभक्तांनी लेखणीचा वापर केला. त्यावेळी आपल्या लेखणीतून अनेक क्रांतिवीर जन्माला आले आणि ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्तता मिळवण्यासाठी लेखणीतून आणि नेत्यांच्या भाषणांतून प्रवृत्त होऊन जनता ब्रिटिशांविरुद्ध लढा देत होती. त्यावेळी लोकांपर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी वृत्तपत्र आणि नेत्यांची भाषणे हीच माध्यमे होती. अर्थात, स्वातंत्र्यापूर्वी वृत्तपत्रे आणि भाषणे केवळ ही दोनच सशक्त प्रसारमाध्यमे होती. मात्र देशाच्या स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधी यांनी आकाशवाणी केंद्राला १२ नोव्हेंबर १९४७ला पहिल्यांदा भेट दिली आणि तेथूनच त्यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले होते. त्या दिवसापासून १२ नोव्हेंबर हा दिवस सार्वजनिक प्रसारण सेवा दिवस म्हणून साजरा केला जातो.

गांधीजींनी आकाशवाणी केंद्राला या दिवशी भेट दिली त्या दिवसाचे औचित्य साधून आकाशवाणीकडून वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तसेच या दिवशी दोन वेगवेगळ्या प्रकारच्या पुरस्कारांची घोषणा कली जाते. सर्वात्तम सार्वजनिक प्रसारण सेवा करणारे आकाशवाणी केंद्र आणि गांधीवादी विचारांचा प्रचार करणारे आकाशवाणी केंद्र असे दोन पुरस्कार आहेत. तसेच १२ नोव्हेंबर २०१२ रोजी केंद्र सरकराने यासंबंधित औपचारिक घोषणा केली आणि भारतातील सार्वजनिक प्रसारण सेवा दिवस म्हणून हा दिवस साजरा करण्याचे ठरवले. आकाशवाणी हे भारताचे सर्वात मोठे प्रसारणाचे माध्यम आहे.

स्वातंत्र्यानंतर आकाशवाणीला हळूहळू महत्त्व प्राप्त होऊ लागले. त्यानंतर दूरदर्शन अस्तित्वात आले. देशभरातील लोकांना दूरदर्शनचे आकर्षण वाटू लागले. आजूबाजूच्या घडामोडींचे प्रत्यक्ष हलते चित्र दूरदर्शनवर दाखवण्यात येऊ लागले. त्यामुळे त्या काळात दूरदर्शन हे प्रसारमाध्यमाचे जास्तीत जास्त प्रभावी माध्यम ठरले. घडलेली घटना काही काळानंतर दूरदर्शनवर प्रसारित करून लोकांना दाखवण्यात येत होती. मात्र १९९०च्या जागतिकीकरणानंतर माध्यम क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडून आले. तंत्रज्ञान, दळणवळणाची सोय यामुळे बातम्यांचे प्रसारण जलद गतीने होऊ लागले. देशभरात काय घडते आहे, याची उत्सुकता लोकांना अधिक जाणवू लागल्यामुळे दूरदर्शन बघण्यासाठी लोक तासन् तास टीव्हीसमोर बसून असल्याचे त्या वेळी पाहावयास मिळत होते.

Answered by Vikramjeeth
11

*Question:-

  • प्रसारमाध्यमांचे महत्व मराठी निबंध

*Answer:-

*निबंध

  • *प्रसारमाध्यमांचे महत्व

देशाच्या स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधी यांनी आकाशवाणी केंद्राला १२ नोव्हेंबर १९४७ला पहिल्यांदा भेट दिली आणि तेथूनच त्यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले होते. त्या दिवसापासून १२ नोव्हेंबर हा दिवस सार्वजनिक प्रसारण सेवा दिवस म्हणून साजरा केला जातो.

स्वातंत्र्यापूर्वी जुलमी पद्धतीने शासन करणा-या ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी देशभक्तांनी लेखणीचा वापर केला. त्यावेळी आपल्या लेखणीतून अनेक क्रांतिवीर जन्माला आले आणि ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्तता मिळवण्यासाठी लेखणीतून आणि नेत्यांच्या भाषणांतून प्रवृत्त होऊन जनता ब्रिटिशांविरुद्ध लढा देत होती. त्यावेळी लोकांपर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी वृत्तपत्र आणि नेत्यांची भाषणे हीच माध्यमे होती. अर्थात, स्वातंत्र्यापूर्वी वृत्तपत्रे आणि भाषणे केवळ ही दोनच सशक्त प्रसारमाध्यमे होती. मात्र देशाच्या स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधी यांनी आकाशवाणी केंद्राला १२ नोव्हेंबर १९४७ला पहिल्यांदा भेट दिली आणि तेथूनच त्यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले होते. त्या दिवसापासून १२ नोव्हेंबर हा दिवस सार्वजनिक प्रसारण सेवा दिवस म्हणून साजरा केला जातो.

गांधीजींनी आकाशवाणी केंद्राला या दिवशी भेट दिली त्या दिवसाचे औचित्य साधून आकाशवाणीकडून वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तसेच या दिवशी दोन वेगवेगळ्या प्रकारच्या पुरस्कारांची घोषणा कली जाते. सर्वात्तम सार्वजनिक प्रसारण सेवा करणारे आकाशवाणी केंद्र आणि गांधीवादी विचारांचा प्रचार करणारे आकाशवाणी केंद्र असे दोन पुरस्कार आहेत. तसेच १२ नोव्हेंबर २०१२ रोजी केंद्र सरकराने यासंबंधित औपचारिक घोषणा केली आणि भारतातील सार्वजनिक प्रसारण सेवा दिवस म्हणून हा दिवस साजरा करण्याचे ठरवले. आकाशवाणी हे भारताचे सर्वात मोठे प्रसारणाचे माध्यम आहे.

स्वातंत्र्यानंतर आकाशवाणीला हळूहळू महत्त्व प्राप्त होऊ लागले. त्यानंतर दूरदर्शन अस्तित्वात आले. देशभरातील लोकांना दूरदर्शनचे आकर्षण वाटू लागले. आजूबाजूच्या घडामोडींचे प्रत्यक्ष हलते चित्र दूरदर्शनवर दाखवण्यात येऊ लागले. त्यामुळे त्या काळात दूरदर्शन हे प्रसारमाध्यमाचे जास्तीत जास्त प्रभावी माध्यम ठरले. घडलेली घटना काही काळानंतर दूरदर्शनवर प्रसारित करून लोकांना दाखवण्यात येत होती. मात्र १९९०च्या जागतिकीकरणानंतर माध्यम क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडून आले. तंत्रज्ञान, दळणवळणाची सोय यामुळे बातम्यांचे प्रसारण जलद गतीने होऊ लागले. देशभरात काय घडते आहे, याची उत्सुकता लोकांना अधिक जाणवू लागल्यामुळे दूरदर्शन बघण्यासाठी लोक तासन् तास टीव्हीसमोर बसून असल्याचे त्या वेळी पाहावयास मिळत होते.

सध्या माहितीचे आणि संदेशाचे वहन इतके जलदगतीने होत आहे की १ सेकंदापूर्वी, २ मिनिटांपूर्वी काय घडले याच्या अपडेट्स ट्विटर किंवा फेसबुक किंवा व्हॉट्सअ‍ॅप यांसारख्या सोशल साईट्सवरून त्वरित प्रसारित होत असतात. एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी संदेशवहनाचे प्रमाण सध्या झटपट होताना दिसत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू असलेल्या संदेशवहनाच्या प्रसारणाची जागा जरी आजच्या फेसबुक व्हॉट्सअ‍ॅपने घेतली असली तरी देखील आजही पुरातन माध्यमांनी त्याच जोशात तग धरला आहे. माध्यमांचा वापर दिवसेंदिवस वाढत असून वृत्तपत्र आणि माध्यमांची जागा फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपने घेतली आहे. परंतु यामुळे मूळ पत्रकारिता आणि पत्रकारांच्या प्रतिमेला धोका आहे. कारण आजकाल माध्यमं इतकी डोईजड झाली आहेत की, कोणीही पत्रकार होऊ शकतो. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपमुळे बातमीची मूल्यं ढळली आहेत. कारण काही वेळेस चुकीची माहिती प्रसारित होऊन जनजीवन अडथळ्यात येते, त्यामुळे माध्यम कधी कधी घातक आहेत की काय असा सवाल पडल्याशिवाय राहत नाही. प्रसारमाध्यम आज बाजारीकरणामुळे चुकीच्या बातम्या सादर करून वृत्तपत्राची विश्वासार्हता डळमळवू पाहत आहे.

Hope it helps you

Be Brainly.

Similar questions