प्रस्तुत कथेचे संवादरूपाने लेखन करा ३. बेटा मी ऐकतो आहे of 9th std
Answers
Answer:
प्र. १. योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा.
(अ) लेखकांना शिरीषला कार्यक्रम द्यायचा नव्हता, कारण…..
(१) तो नुकताच शिकायला आला होता.
(२) त्याला वाद्य वाजवता येत नव्हते.
(३) नुकताच शिकायला आल्याने विद्यालयाचे नाव बदनाम होण्याची शक्यता होती.
(४) तो कलेच्या प्रांतातला नवखा मुसाफिर होता.
उत्तर: लेखकांना शिरीषला कार्यक्रम द्यायचा नव्हता, कारण तो नुकताच शिकायला आल्याने विद्यालायाचे नाव बदनाम होण्याची शक्यता होती.
(आ) लेखकांना आजपर्यंत बसला नव्हता तेवढा धक्का बसला, कारण….
(१) बारा वर्षांचा मुलगा शांतपणे वाजवत होता.
(२) ऐनवेळी कार्यक्रमाला हजर राहूनही शिरीष एवढे सुंदर वाजवत होता.
(३) शिरीषचा चेहरा पूर्वीच्या आत्मविश्वासाने न्हाऊन निघाला.
(४) मात्रेचाही फरक न करता शिरीष गात होता.
उत्तर: लेखकांना आजपर्यंत बसला नव्हता धक्का बसला, कारण बार वर्षांचा मुलगा शांतपणे वाजवत होता.
प्र. २. आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:
प्र. ३. जोड्या जुळवा.
उत्तर:
प्र. ४. खालील परिणामाबाबतच्या घटना लिहा.
उत्तर:
प्र. ५. खालील वाक्यांत अधोरेखित शब्दांऐवजी पाठात आलेले योग्य वाकप्रचार शोधून वाक्य पुन्हा लिहा.
(१) वर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे शिकवणे लक्षपूर्वक ऐकले पाहिजे.
उत्तर: वर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे शिकवणे जिवाचे कान करून ऐकले पाहिजे.
(२) आपल्या शाळेचे नाव वाईट होऊ नये, म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने काळजी घ्यायला हवी.
उत्तर: आपल्या शाळेचे नाव खराब होऊ नये, म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने काळजी घ्यायला हवी.
(३) उत्तम वादनाने लेखकाचे शिरीषबाबतचे मत चांगले झाले.
उत्तर: उत्तम वादनाने लेखकाचे शिरीषबाबतचा ग्रह चांगला झाला.
प्र. ६. खालील शब्द व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.
उत्तर:
(१) कोलाहल – गोंधळ
(२) अगतिक – गरजू
(३) तऱ्हेवाईक – विचित्र
(४) मुसाफिर – प्रवासी
(५) उद्युक्त – प्रेरित
प्र. ७. स्वमत.
(अ) शिरीषमधील तुम्हांला समजलेली गुणवैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर: शिरीषमध्ये संगीत कलेवर जिवापाड प्रेम करणारे वडील व त्यांच्या अपघातामुळे संगीतसेवेपासून अंतरलेल्या वडिलांच्या सुखासाठी धडपडणारा भावुक मुलगा दिसून येतो. वडिलांच्या आजारपणाच्या काळात त्यांच्यासोबत राहून त्याने त्यांची सेवा केली. वडिलांच्या निधनानंतर ताबडतोब शिकवणीचे पैसे पाठवून दिले. या प्रसंगावरून त्याचा प्रामाणिकपणा दिसून येतो. शिरीषने नानांना स्मरून अखंडपणे संगीताचा ध्यास घेतला, अहोरात्र सराव केला. यातून त्याची मेहनत व ध्येयपूर्तीची धडपड दिसून येते.
(आ) शिरीषची भूमिका तुम्हांला कोणता संदेश देते, ते तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर: शिरीषच्या वडिलांचा संगीत कलेवर खूप प्रेम होते. परंतु एका अपघातामुळे ते पूर्ण बहिरे झाले. बहिरेपणामुळे त्यांची संगीतसेवा अंतरली. त्यामुळे वडिलांना सुख मिळावे याकरता शिरीषने संगीत कला शिकण्याचा निर्णय घेतला. वडिलांच्या सौख्यासाठी शिरीषने अखंडपणे संगीत कलेची साधना केली. वडिलांच्या आजारपणाच्या काळात त्यांच्यासोबत राहून त्याने त्यांची सेवा केली. वडिलांच्या निधनानंतरही लोकनिंदेची पर्वा न करता, त्या कठीण परिस्थितीतही त्याने आपले ध्येय गाठले. शिरीषच्या या गंभीर भूमिकेतून आपल्याला असा संदेश मिळतो की, आपणही आपल्या जीवनात कितीही मोठी संकटे आली तरी न डगमगता धैर्याने परिस्थितीशी सामना केला पाहिजे.
प्र. ८. अभिव्यक्ती.
(अ) पाठातील तुम्हांला सर्वात आवडलेली गोष्ट सांगून ती सकारण स्पष्ट करा.
उत्तर: मला सर्वात आवडलेली गोष्ट – ज्या दिवशी नाना गेले त्याच दिवशी शिरीषने ठरवले, की संगीत बंद! पण दुसऱ्याच क्षणी त्याच्या मनात विचार आला, की त्याचे नाना तेव्हा त्याचे वादन ऐकू शकत नव्हते; पण आता त्याच्याच शेजारी बसून नक्की ते ऐकत आहेत. या विचारासरशी, लोकांच्या निंदेकडे लक्ष न देता शिरीषने त्याच दिवसापासून व्हायोलिन वाजवायला सुरुवात केली. चोवीस तास एकच उद्योग, एकच ध्यास! शिरीष सराव करू लागला, म्हणजे त्याला भास व्हायचा, की पुढच्या ताना व सूर त्याला नानाच सांगत आहेत, तबल्याचा ठेका त्यांनीच धरला आहे व तंबोऱ्याच्या तारांवरून पण त्यांचीच बोटे फिरत आहेत. यावरून शिरीषची नानांबद्दलची निष्ठा दिसून येते.
(आ) प्रस्तुत कथेचे संवादरूपाने लेखन करा.
उत्तर:
शिरीष : आपणच का पी.जनार्दन?
गुरुजी : होय.
शिरीष : मला संगीत शिकायचे आहे. मला गाण्याची फार आवड आहे.
गुरुजी: तुला गाण्याची फार आवड आहे तर!
शिरीष : माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना, मी संगीत शिकलेले फार आवडेल. मी आपल्याकडे शिकायला येईन; पण माझ्याबरोबर रोज माझे वडील पण शिकवणी चालू असताना वर्गात बसतील. अशी माझी अट आहे.
गुरुजी: मान्य! तुझ्या अटी एकदम मान्य; पण तुला त्यासाठी महिना पन्नास रुपये फी द्यावी लागेल!
शिरीष : कबूल! मी उद्यापासून शिकवणीला येतो.
कथा लेखन:
"मी ऐकत आहे," मी माझ्या मित्राशी बोललो ज्याने मला एक कहाणी सांगितली होती की शाहपूर गावात एक श्रीमंत शेतकरी होता, त्याच्याकडे बरीच जमीन होती, त्याच्याकडे सर्व काही काळजी घेण्यासाठी गुरेढोरे आणि नोकर नोकरदार होते. त्याच्याकडे त्याला हवे असलेले सर्व काही होते आणि आपल्या दोन मुलांसह आनंदी जीवन जगण्यासाठी. काही वर्षे संपल्यानंतर, शेतक's्याचा लहान मुलगा आपल्या वडिलांच्या मालमत्तेबद्दल हाव वाटू लागला आणि सर्व काही हवे आहे अशी मागणी केली.
त्याच्या वडिलांनी त्याला सांगितले होते की "टू मच वेल्थ तुम्हाला खूष करत नाही". तो आपल्या वडिलांचा सल्ला ऐकणार नाही आणि त्याचा वाटा मिळवू शकणार नाही. त्याने सर्व मालमत्ता विकली आणि काय करावे हे त्यांना माहित नव्हते आणि दुसर्या देशात जाण्याचे त्याने ठरविले. तो कर्जात पडला आणि पैसे मिळवण्यासाठीच्या वाईट मार्गात पडला, लवकरच त्याचे सर्व पैसे संपले. तो दीन व गरीब होता. त्याने रस्त्यावर भीक मागितली पण कोणीही त्याला मदत केली नाही. बरीच वर्षे तो वाढत गेला आणि पश्चात्ताप करत आयुष्य चालू ठेवले. मृत्यूच्या पलंगावर, त्याने काही तासांसारखे काही केले आणि त्याने केलेल्या चुकांबद्दल स्वप्न पाहिले.