(१) प्रस्तुत पाठात आलेल्या साहित्य प्रकारांची नावे लिहा.
Answers
Answer:
प्रस्तुत पाठात आलेल्या साहित्य प्रकारांची नावे लिहा.
Explanation:
साहित्यप्रकार : साहित्यप्रकार म्हणजे साहित्याचे वर्गीकरण. लघुकथा, कादंबरी, कविता (भाव), महाकाव्य, खंडकाव्य, नाटक, शोकात्मिका, सुखात्मिका, प्रहसन अशा अनेक प्रकारांमध्ये साहित्याचे वर्गीकरण केले जाते. वेगवेगळ्या साहित्यप्रकारांची सुटी-सुटी वैशिष्ट्ये सांगणारे आणि यांपैकी प्रत्येक साहित्यप्रकाराची ऐतिहासिक उत्क्रांती कशी झाली, याची मांडणी करणारे अभ्यास महत्त्वाचे आहेतच परंतु साहित्यप्रकार म्हणजे काय ? या प्रश्नाची तात्त्विक वा सौंदर्यशास्त्रीय चर्चा केल्याशिवाय साहित्यप्रकारांच्या संकल्पनेला स्पष्टता लाभत नाही.
साहित्याचे वर्गीकरण : साहित्यप्रकारांचा तात्त्विक विचार म्हणजे वर्गीकरणाचा सिद्घांत [⟶झांर (Genre) थिअरी ] होय. वर्गीकरण म्हणजे काय ? ते का करायचे ? मानवी मनाच्या अनुभवप्रक्रियेत व ज्ञानप्रक्रियेत वर्गीकरणाचे स्थान काय ? कलेच्या निर्मितीमध्ये आणि कलानुभवामध्ये वर्गीकरणाचे स्थान काय ? हे प्रश्न मूलतः सौंदर्यशास्त्रामधील तात्त्विक वा सैद्घांतिक प्रश्न आहेत. या प्रश्नांविषयी काही मूलभूत भूमिका मांडल्या गेलेल्या आहेत. संस्कृत काव्यशास्त्राच्या परंपरेमध्ये काव्यप्रकारांची चर्चा ⇨ दंडी, ⇨ भामह आणि ⇨ वामन या शास्त्रकारांनी केलेली आहे. त्याचप्रमाणे भरताच्या ⇨ नाट्यशास्त्रा मध्येही दशरूपांची वा दशरूपकांची–म्हणजेच नाट्याच्या प्रकारांची–चर्चा आलेली आहे. परंतु या वर्गीकरणांविषयीचे सैद्घांतिक विवेचन या परंपरेमध्ये पुरेसे झालेले नाही. कारणे काहीही असोत परंतु रस आणि भाव, ध्वनी, रीती यांसारख्या संकल्पना जशा सैद्घांतिक पातळीवर चर्चिल्या गेल्या, तशी साहित्यप्रकारांची चर्चा संस्कृत काव्यशास्त्रात झालेली नाही. ⇨ॲरिस्टॉटलच्या (इ. स. पू. ३८४–३२२) पोएटिक्स (काव्यशास्त्र)या ग्रंथामध्ये वर उल्लेखिलेल्या प्रश्नांपैकी काही प्रश्नांविषयी तात्त्विक विवेचन आलेले आहे. कलाप्रकार व काव्यप्रकार/साहित्यप्रकार यांच्याविषयी ॲरिस्टॉटलने जे सिद्घांतन केले, त्याच्या आधारे पाश्चात्त्य समीक्षाव्यवहार पुढे अनेक शतके चालू होता.