प्रश्न 2.टिपा लिहा. (6)
1.स्वयं व्यवस्थापन.
2. रोजगार क्षमता नियोजन
3. वेळेचे व्यवस्थापन
4. वक्तशीरपणा
5. ध्येय निश्चिती.
6. वेळेचा महत्तम वापर
Answers
Answer:
rojgar samta niyojan
Explanation:
rojgar samta nuyojan
Answer:
1. स्वयं व्यवस्थापन -
ज्यावेळेस व्यक्ती स्वतः आपल्या सर्व गोष्टींचे व्यवस्थापन म्हणजे नियोजन करतो त्याला स्वयं व्यवस्थापन असे म्हणतात. स्वयं व्यवस्थापनामुळे ठरवलेल्या गोष्टी अगदी वेळेवर पूर्ण होतात व त्याचे खूप फायदे होतात. आपण नियोजित केलेले काम योग्य त्या वेळी पूर्ण होण्यास स्वयं व्यवस्थापनाची मदत होते.
2. रोजगार क्षमता नियोजन-
एका विशिष्ट अशा प्रदेशात तेथे उपलब्ध असलेल्या लोकसंख्येनुसार कोणत्या प्रकारच्या रोजगार निर्माण करता येऊ शकते याचे जे नियोजन केले जाते त्याला रोजगार क्षमता नियोजन असे म्हणतात.
3. वेळेचे व्यवस्थापन-
ज्या वेळेस एखादी गोष्ट करायची असेल त्या वेळेस ती गोष्ट योग्य वेळेत होणे गरजेचे असते ,तरच त्याचे आपल्याला योग्य ते फायदे मिळू शकतात म्हणून त्यासाठी केलेल्या नियोजनास वेळेचे व्यवस्थापन असे म्हणतात.
4. वक्तशीरपणा-
एखादी गोष्ट करण्यासाठी जो कालावधी ठरवलेला असेल त्या कालावधीच्या आतच ती गोष्ट करणे म्हणजे वक्तशीरपणा होय.
5. ध्येय निश्चिती-
कुठलीही गोष्ट प्राप्त करण्यासाठी काही ध्येय ठरवणे गरजेचे असते आणि ते ध्येय निश्चित केल्यानंतर त्यासाठी योग्य ते प्रयत्न करणे गरजेचे असते यालाच ध्येयनिश्चिती असे म्हणतात.
6. वेळेचा महत्तम वापर -
कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी त्याला लागणारा वेळेचा जास्तीत जास्त सदुपयोग करणे व ठरवलेली गोष्ट मिळवणे यालाच वेळेचा महत्तम वापर असे म्हणतात.