प्रश्न 3) समुद्र किनारी गेल्यास कोणती काळजी
घ्याल ते लिहा .
Answers
Explanation:
१. तिथीला ३ ने गुणायचं आणि ४ ने भागायचं. . उदा. पौर्णिमा म्हणजे
१५ * ३ = ४५
४५ / ४ = ११.२५
म्हणजे सव्वा अकरा वाजता दुपारी आणि रात्री पूर्ण भरती. त्यानंतर ६ तासांनी पूर्ण ओहोटी
२. भरती-ओहोटेच्या गणितात (तिथी) * ३ करुन मिनीटे अॅड करतात.
नवमी असेल तर ९ * ३/४ = ६. ७५
यात ६ हा पुर्णांक तास धरायचा, आणि ०.७५ म्हणजे ४५ मिनीटे ( एका तासाच्या ०.७५ पट म्हणजे ४५ मिनीटे)
तसेच ९ * ३ = २७ मिनीटे
एकुण मिनीटे : ४५+२७ = ७२ मिनीटे = १ तास १२ मिनीटे
यात आधीचे ६ मिळवा म्हणजे ६ + (१ तास १२ मिनीटे) = ७ वाजुन १२ मिनीटे ही भरतीची वेळ मिळाली.
३. तिथीत +१ करून त्याची पाऊणपट केली की पूर्ण भरतीची वेळ कळते, उदा. पौर्णिमा- १५, १५+१= १६. १६ ची पाऊणपट म्हणजे १२. म्हणजेच दुपारी १२ ला पूर्ण भरती, नंतर ६ तासांनी पूर्ण ओहोटी.
काही गोल्डन रूल्स:
१. स्थानिक लोकांचा सल्ला ऐकणे.
२. ओहोटी असेल तर शक्यतो पाण्यात जाऊ नका. कारण ओहोटी आत खेचून घेते. भरती बाहेर फेकते.
३. काही बीचेस एकदम खोल होत जातात, काही बीचेस वर ओहोटीचे पाणी ओसरण्याचा आणि भरतीचे पाणी भरण्याचा वेग जास्त असतो. काही ठिकाणी मध्येच खडक असतात, जे पण खुप धोकादायक ठरु शकतात.
४. पाण्यात उतरताना मद्यपान करू नका.
५. किनार्यावरुन बघितल्यावर पाण्यात आडव्या लांबलचक लाटा तयार होत असतील, व त्या जिथे फुटत असतील, तिथवर उथळ (तरी पुरुषदोन पुरुष उंचीचा) किनारा असतो, तर त्यापेक्षा निम्म्या अंतरापर्यंतच समुद्रात जावे. त्यापुढे जाऊ नये.
६. जर लांबलच़क आडव्या लाटा तयार होत नसतील, त्या रुंदीला फारच छोट्या अस्तील, वा जिथे लाटा तयार होऊन फुटण्याचे प्रमाण इतर जागांपेक्षा तुलनेत नगण्य असते अशा ठिकाणी पाऊलही ठेवू नये.
७. कोणत्याही समुद्र किनार्यावर, विशिष्ट अंतरापर्यंत पुळण असते, तिथवरच कमरेभर पाण्यात धोका कमी असतो. या विशिष्ट अंतराचे पुढे समुद्रकिनारा समुद्रात एकदम उतार पकडुन खोल खोल जातो. ही उतार सुरु होणारी जागा समजायची कशी? तर आमच्या अनुमानाने, जिथे "लाटा फुटताना दिसताहेत" तिथे उथळ किनारा असतो.
८. बीचवर अशा काही अॅक्टीवीटी करणार असाल पॅरासेलिंग वगैरे वगैरे तर प्लीज त्यांचे सेफ्टी मेजर्स बघून निर्णय घ्या
Answer:
3) समुद्र किनारी गेल्यास कोणती काळजी
घ्याल ते लिहा .