प्रश्न 4. स्थितिक विद्युत बल हे असंपर्क बल आहे. हे सिद्ध करण्यासाठी कोणता प्रयोग कराल
Answers
Answer:
स्थितिक विद्युत बल हे असंपर्क बल आहे. हे सिद्ध करण्यासाठी कोणता प्रयोग कराल
Answer:
स्थितिक विद्युत बल हे असंपर्क बल आहे हे सिद्ध करण्यासाठी आपण खूप प्रयोग करू शकतो. त्यातील एक प्रयोग आपण आता पाहूया.
एक काचेची मोजपट्टी घ्या. ती एका लोकराच्या कापडावर घासा. आता त्या पट्टीला एका पाण्याच्या धारे पासून थोड्या अंतरावर न्या. तुम्हाला असे दिसेल की,जेव्हा तुम्ही पट्टीची हालचाल करता तेव्हा पाण्याची धार देखील त्याच्या ने आकर्षित होते व पट्टी कडे खेचली जाते.
हे असे झाले कारण, जेव्हा आपण पट्टी लोकराच्या कापडावर घासतो तेव्हा कापडावरील अणू हे पट्टीला चिकटतात. ते अणू ऋण प्रभारित असतात व पाण्यातील कण हे धन प्रभारित असतात. विरुद्ध प्रभार असल्यामुळे दोन गोष्टी एकमेकांकडे आकर्षित होतात. यामुळेच स्थितिक विद्युत बल ते प्रयूक्त होते.
येथे काचेची मोजपट्टी व पाण्याची धार यांच्यात संपर्क नसताना ही आपल्याला हालचाल दिसून येते, म्हणून आपण असे म्हणू शकतो की, स्थितिक विद्युत बल हे असंपर्क बल आहे.