India Languages, asked by priyadeshmukh9373, 4 months ago

प्रश्न 9) खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर 160 ते 200 शब्दांत निबंध
एकविसाव्या शतकाचे मनोगत

Answers

Answered by ashusonkamble9
0

Answer:-

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण एकविसाव्या (21 )शतकातील आव्हाने मराठी निबंध |. या निबंधामध्‍ये  मानवाने केलेली वैज्ञानिक व आर्थीक प्रगती व त्‍याबदल्‍यात त्‍याने पर्यावरणाला पोहचवलेली हानी , वाढलेली लोकसंख्‍या व इतर सामा‍जिक समस्‍या मानवापुढे कश्‍याप्रकारे समोर आल्‍या आहेत याबद्दल  स्‍पष्‍टीकरणात्‍मक दोन  निबंध दिलेले आहेत  चला तर मग सुरूवात करूया निबंधाला

एकविसावे शतक आज माणसांसमोर अनेक नवी आव्हाने घेऊन उभे ठाकले आहे. नुकत्याच सरलेल्या विसाव्या शतकाकडे दृष्टिक्षेप टाकला तर काय आढळते? चतुर मानवाने नेत्रदीपक प्रगती साधली आहे.एकविसाव्या शतकातील मानवाने आपल्या पूर्वजांपेक्षा मोठी वैचारिक प्रगती साधली आहे. आज आपण 'व्यक्तिस्वातंत्र्य' हा मूलभूत हक्क मानला आहे. कोणी कुणाचा गुलाम नाही.  

आपल्या देशातल्या कुठल्याही कोपऱ्यात राहणाऱ्या माणसाला स्वत:ची प्रगती साधण्याचा हक्क आहे. कुठल्याही विशिष्ट ज्ञानावर वा कामावर कुणाचीही मक्तेदारी राहिली नाही. जन्मावर 'कर्म' अवलंबून नाही, तर कर्मावर त्याचे समाजातील स्थान' अवलंबून आहे. म्हणून तर दलित समाजातील व्यक्तीही राष्ट्रपतिपद भुषवू शकते.

एकविसाव्या शतकातील सगळ्यात बिकट आव्हान आहे ते म्हणजे 'लोकसंख्येच्या विस्फोटाचे. भारताची लोकसंख्या अब्जांची मर्यादा ओलांडून पुढे गेली आहे. विश्वातील या सर्व मानवांना मूलभूत गरजा पुरवणे हेही एक आव्हानच आहे. माणसाने हे ओळखले आहे. पण त्याचबरोबर या लोकसंख्यावाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठीही कंबर कसावी लागणार आहे. पण अंधश्रद्धा व अज्ञान हे फार मोठे अडथळे मध्ये आहेत. ते दूर करणे हेही फार मोठे आव्हान आहे.  

आपल्या भारतापुढे गरिबी व बेकारी हे एक मोठे आव्हान आहे. पण आम्ही ते स्वीकारले आहे. हरितक्रांती, श्वेतक्रांती यांनी प्रत्येकाला चारा उपलब्ध केला आहे. संगणकामुळे बेकारी वाढेल असे वाटत असतानाच संगणकाने अनेक नवे व्यवसायही निर्माण केले. नव्या उद्योगधंदयांबरोबरच आमच्या अनेक परंपरागत उदयोगांचेही पुनरुज्जीवन केले जात आहे.

एकविसाव्या शतकात आज माणसांपुढे उभा राहिलेला मोठा प्रश्न म्हणजे पर्यावरणाचा! माणसाने अविचाराने जंगलतोड केली, उभ्या केलेल्या प्रचंड कारखान्यांमुळे हवा बेसुमार दूषित झाली. माणसांना विविध आजारांना तोंड दयावे लागत आहे. त्यांत दुष्काळ, महापूर, भूकंप अशा नाना नैसर्गिक आपत्ती माणसांची कसोटी पाहायला येत आहेत. वैश्विक तापमान वाढत आहे, हे एक नवे संकट येत आहे. पण एकविसाव्या शतकातील माणूस आता याबाबतही जागृत झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रात नित्य नवे शोध लावून तो या आजारांवर मात करत आहे. आता तर आमच्या संशोधकांनी माणसाच्या जनुकांचाही अभ्यास चालवला आहे. त्यातून तो माणसाला आपल्यातील त्रुटी दूर करण्यास मदत करील.

एकविसाव्या शतकात डाचणारी आणखी एक गोष्ट म्हणजे सामाजिक विषमता! जात, धर्म, पंथ, श्रीमंती, शिक्षण अशा अनेक पातळ्यांवर भीषण विषमता आहे. त्यामुळे जगाच्या पाठीवर कुठे ना कुठे संघर्ष पेटलेला असतो. या संघर्षाने तीव्र स्वरूप घेतले की, त्यांतून 'दहशतवाद' बोकाळतो आणि माणसाचे जगणे मोठे कठीण होते.

भारतात आणि इतर काही देशांत भ्रष्टाचाराचे एवढे साम्राज्य पसरले आहे की, आपल्या क्षुल्लक फायद्यासाठी भेसळ करणारा माणूस सहज दुसऱ्यांचे प्राण घेतो. याला कारण म्हणजे मानवी जीवनातील नैतिक मूल्यांची झालेली घसरण. हे सारे चित्र एकविसाव्या शतकातील माणसांचे जगणे असह्य, भयंकर करून टाकेल का? अशी भीती क्षणभर वाटते. पण क्षणभरच ! कारण अनेक आपत्तीत जगाच्या कानाकोपऱ्यांतून धावत आलेले मदतीचे हात आठवतात आणि ते आश्वासन देतात की, या साऱ्या साऱ्या आव्हानांना आम्ही पुरून उरू.

Similar questions