Geography, asked by SamruddhiGorde, 10 months ago

प्रश्न ५. (अ) एक चौकिमी क्षेत्र दर्शवणाऱ्या 'अ' व 'आ'
चौकोनांमधील लोकसंख्येच्या घनतेची तुलना करून
वर्गवारी करा.
(आ) आकृती 'आ' मधील एक चिन्ह = १०० व्यक्ती
असे प्रमाण असल्यास स्त्री-पुरुष प्रमाण सांगा.

Answers

Answered by majeedqureshi7
7

Answer:

लिंग गुणोत्तर (Sex ratio) हे लोकसंख्येमधील पुरुष व स्त्रीयांचे गुणोत्तर आहे. जगात सर्वसाधारणपणे पुरूष व स्त्रियांचे प्रमाण १:१ असे अपेक्षित असले तरीही प्रत्येक देशात हे गुणोत्तर वेगळे आढळते.

भारतात स्त्रियांची घटणारी लोकसंख्या चिंतेची बाब झाली आहे.[२] २०११ सालच्या जनगणना अहवालानुसार भारतात १००० पुरुषांमागे ९४० स्त्रिया आहेत.[३] म्हणजेच लिंग गुणोत्तर ९४० आहे.[३]

लिंग गुणोत्तर सूत्र = (स्त्री संख्या / पुरुष संख्या) x १०००

काही राज्यांची लिंग-गुणोत्तरे : केरळ - १०८४, तामिळनाडू - ९९६, महाराष्ट्र - ९२९, पंजाब - ८९५, दिल्ली - ८६८

Answered by dhanrajjadhav0102
0

Answer:

अ. 'अ' चौकोनामध्ये ७ व्यक्ती प्रति चौकिमी असल्याने येथे लोकसंख्येची घनता कमी आहे.

म्हणजेच, हे क्षेत्र विरळ लोकसंख्येचे आहे.

आ. 'आ' चौकोनामध्ये १८ व्यक्ती प्रति चौकिमी असल्याने येथे

लोकसंख्येची घनता जास्त आहे.

म्हणजेच, हे क्षेत्र दाट लोकसंख्येचे आहे.

जर आकृती 'आ' मध्ये एक चिन्ह = १०० व्यक्ती

तर स्त्रियांची संख्या १० x १०० = १००० असून

पुरुषांची संख्या ८x१०० = ८०० इतकी आहे.

जर पुरुषांची संख्या = १००० मानली,

तर स्त्रियांची संख्या = ?

.. लिंग गुणोत्तर = १००० X १००० = १२५०

८००

.. स्त्रियांची संख्या = १२५०

म्हणजेच, स्त्रियांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत अधिक आहे.

Similar questions