प्रश्नाबाउत्तर लिहा. अ) संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीवावत दिलेल्या दृष्टांतातील तुम्हाला आवडलेला दृष्टांत लिहा . आ) संतांचे कार्य नेहमीच मार्गदर्शक ठरते याविषयी तुमचे मत स्पष्ट करा .
Answers
अ) उत्तर: संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीसाठी आतुर झालेल्या आपल्या मन:स्थितीचे वर्णन करताना दिलेले लहान बाळाचे उदाहरण अतिशय समर्पक वाटते. ज्याप्रमाणे लहान बाळाचे विश्व हे त्याची आईचअसते त्याचप्रमाणे तुकारामांचे विश्व म्हणजे फक्त विठ्ठलच आहे. बाळाला भूक लागल्यावर तो अतिशय आतुरतेने आपल्या आईची वाट पाहतो. तिच्या भेटीसाठी तो आतुर झालेला असतो. तिची भेट होणे हे त्याचे ध्येय असते. त्याचप्रमाणे विठ्ठलाची भेट हे संत तुकारामांच्या जीवनाचे ध्येय आहे.
आ) महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांनी या भूमीला आपल्या अस्तित्वाने पावन केले आहे. त्यांची शिकवण आजही लोकांचा लक्षात आहे. संतांनी वारकरी संप्रदायाची निर्मिती केली होती. संतवाणी आजही लोकांचे मार्गदर्शन करते. ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी लोक अनुसरण करतात.
संतांनी त्यांचा कार्यातून लोकांना प्रभावित केले आहे. उदा. संत गाडगे बाबा यांनी स्वच्छता अभियानाचा पाय रचला. लोक आजही त्यांचा कार्यानी प्रभावित होऊन स्वच्छतेला प्राधान्य देतात.