प्रश्न २ खालील संज्ञा/ संकल्पना स्पष्ट करा (कोणत्याही 2) / १) उद्योजक २) इ- बँकिंग सेवा ३) बँकिंग
Answers
Answer:
see attachment hope it helps you BRAINLIST mark please
Answer:
उद्योजक-
उद्योजक हा असा व्यक्ती असतो की जो आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि मेहनतीच्या जोरावर भांडवल उभारून कोणतीतरी नवीन गोष्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. उभारलेल्या भांडवलाच्या जोरावर आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर भांडवल वाढवून व नफा कमावून बाजारात जो आपले नाव ठेवतो त्याला उद्योजक असे म्हणतात.
ई-बँकिंग सेवा-
कुठल्याही बँकेत गेल्यानंतर दैनंदिन व्यवहार हे भौतिक रित्या होत असतात. परंतु लोकांना सुख सुविधा देण्यासाठी ई-बँकिंग सेवेची निर्मिती करण्यात आली.
आंतरजालाच्या माध्यमातून बँकेतील सुविधा या ग्राहकांपर्यंत पोहोचवल्या जातात त्याला ई-बँकिंग सेवा असे म्हणतात. ग्राहक घरी बसून आपले पैसे दुसऱ्याला पाठवू शकतो. तसेच इतर अनेक सुविधांचा लाभ घरी बसून घेऊ शकतो त्याला ई-बँकिंग सेवा असे म्हणतात.
बँकिंग-
पैसे उभारून एखाद्या व्यवसायाला हातभार लावण्यासाठी किंवा कोणत्याही व्यवहार करण्यासाठी बँकिंग क्षेत्राचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो.
कुठल्याही प्रकारच्या पैशांचा व्यवहार करून ती मालमत्ता कशी वाढवली जाईल यासाठी बँकिंग क्षेत्राचा उपयोग केला जातो.