Geography, asked by pranaybhelave, 2 months ago

प्रश्न ६. खाली दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे रेषालेख तयार करा व त्या
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
(०६)
भारत
नागरीकरणाचा कल (%)
वर्ष
१९६१
१९७१
१९८१
१९९१
२००१
२०११
नागरीकरण
१८.०
१८.२
२३.३
२५.७
२७.८
३१.२
प्रश्न :
२) २००१ ते २०११ या वर्षामध्ये नागरीकरणाची किती टक्के वाढ झाली ?
३) कोणत्या दशकादरम्यान नागरीकरणाची वाढ सर्वाधिक आहे ?​

Answers

Answered by harib5730
2

answer :-सध्याच्या जागतिक लोकसंख्येत विकसनशील देशांची लोकसंख्या साधारणतः 80 टक्के आहे आणि ती 2050 पर्यंत 88 टक्के होण्याची शक्यता आहे. विकसनशील देशांचा लोकसंख्या वाढीचा वेग 1.5 टक्के आहे, तर विकसित देशांचा फक्त 0.5 टक्के आहे. विकसनशील देशांच्या लोकसंख्येच्या जडणघडणीत भारताचा मोठा वाटा आहे...

जगाच्या लोकसंख्येने आतापर्यंत सातशे कोटींचा टप्पा ओलांडला आहे आणि ती सन 2050 पर्यंत जवळजवळ 900 कोटींपर्यंत जाऊन ठेपणार आहे. जगाच्या लोकसंख्यावाढीचा आधीचा वेग अतिशय कमी होता, म्हणजे सन 1804 मध्ये जगाची लोकसंख्या शंभर कोटी होती, ती 200 कोटी होण्यास 123 वर्षांचा कालावधी जावा लागला. त्यानंतर 200 कोटी लोकसंख्येचे 300 कोटी होण्यास फक्त 33 वर्षे लागली आणि त्यानंतर 300 कोटींची 400 कोटी लोकसंख्या फक्त 14 वर्षांत झाली. सध्याच्या वेगानुसार, सन 2028 मध्ये ती 800 कोटी झालेली असेल. मधल्या काळात अधिक असणारा वेग आता मंदावतो आहे, तरीही हळूहळू वाढत जाऊन सर्वसाधारणपणे सन 2200 पर्यंत जागतिक लोकसंख्या एक हजार कोटींवर जाऊन स्थिरावेल, असा अंदाज आहे.

सध्याच्या जागतिक लोकसंख्येत विकसनशील देशांची लोकसंख्या साधारणतः 80 टक्के आहे आणि ती सन 2050 पर्यंत 88 टक्के होण्याची शक्यता आहे. विकसनशील देशांचा लोकसंख्यावाढीचा वेग 1.5 टक्के आहे, तर विकसित देशांचा फक्त 0.5 टक्के आहे. विकसनशील देशांच्या लोकसंख्येच्या जडणघडणीत भारताचा मोठा वाटा आहे.

भारताची लोकसंख्या

लोकसंख्येच्या दृष्टीने भारत जगात सध्या दुसर्‍या क्रमांकावर आहे. पहिला क्रमांक अर्थातच चीनचा आहे. सध्याच्या भारतीय लोकसंख्यावाढीचे प्रमाण लक्षात घेता सन 2025 पर्यंत भारत चीनला मागे टाकून प्रथम क्रमांकावर येऊ शकेल. सध्याच्या जागतिक लोकसंख्येत भारताचा वाटा 17 टक्के आहे; परंतु जगाच्या भूभागांपैकी फक्त 2.4 टक्के भूभाग भारताने व्यापला आहे. दरवर्षी भारतीय लोकसंख्येत सुमारे 1.8 कोटींची भर पडते. या वेगाने सन 2050 पर्यंत भारतीय लोकसंख्या 153 कोटींवर पोहोचेल आणि तेव्हा चीनची लोकसंख्या 139 कोटी असेल.

तक्ता क्र. 1- लोकसंख्या आणि लोकसंख्या वाढीचा दर, 1901-2011

वर्ष

लोकसंख्या (दशलक्ष)

वार्षिक वाढीचा दर

% दशकातील वाढीचा दर

1901

238.4

-

-

1911

252.1

0.56

5.8

1921

251.3

- 0.03

0.3

1931

279.0

1.04

11.0

1941

318.7

1.33

14.2

1951

361.1

1.25

13.3

1961

439.2

1.96

21.6

1971

548.1

2.20

24.8

1981

683.3

2.22

24.7

1991

843.3

2.14

23.9

2001

1027.0

1.93

21.5

2011

1210.2

1.64

17.6

तक्ता क्र. 1 नुसार विसाव्या शतकातील किंवा गेल्या 110 वर्षांतील भारतीय लोकसंख्या चार गटात विभागता येते.

1. 1901 ते 1921- स्थिर लोकसंख्या, 2. 1921 ते 1951 - स्थिर वाढ, 3. 1951 ते 1981 - जलद/अतिजलद वाढ आणि 4. 1981 ते 2011 - जलद वाढ मात्र वेग मंदावला

आलेख 1ः लोकसंख्या आणि वार्षिक वाढीचा दर, भारत, 1901-2011

आलेख 1 वरून स्पष्ट होणारी गोष्ट म्हणजे लोकसंख्या वाढत असली, तरी लोकसंख्यावाढीचा वेग निश्‍चितपणे कमी झालेला आहे. जो वेग 1971-1981 च्या दरम्यान होता, तो 2001-2011 मध्ये महत्त्वपूर्णरीत्या खाली आला आहे. भारतीय लोकसंख्येच्या इतिहासात 1911-1921 या काळात फक्त एकदाच लोकसंख्या कमी झाली होती. वाढीचा वेग ॠण झाला होता. पहिले जागतिक महायुद्ध तसेच प्लेगच्या साथीत सुमारे 30 लाख मृत्यू झाले होते. याशिवाय 1918 मध्ये आलेल्या एन्फ्ल्यूएंझाच्या साथीत 1.2 ते 1.3 कोटी लोकांना प्राण गमवावा लागला होता.

लोकसंख्या दुप्पट होण्याचा जो वेग आहे, त्यावरून लोकसंख्या किती जलद गतीने वाढते आहे, याचा अंदाज बांधता येतो. सन 1901 मध्ये असणारी 23.8 कोटी लोकसंख्या दुप्पट होण्यासाठी साठ वर्षांचा कालावधी जावा लागला, त्यानंतर मात्र 30 वर्षांतच लोकसंख्या दुप्पट झाली. हा काळ अत्यंत जलद लोकसंख्यावाढीचा होता आणि तेव्हाच लोकसंख्या हा एका दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आणि थोडासा काळजीचा मुद्दा म्हणूनही पुढे आला.

मागील दोन दशकांत लोकसंख्या वाढीचा वेग मंदावला असला, तरी आणखी काही काळापर्यंत लोकसंख्या वाढत राहणार आहे. याचे मुख्य कारण म्हणजे आधीची मुळातच जास्त असणारी लोकसंख्या आणि लोकसंख्येचे वयानुसार वर्गीकरण. भारतीय लोकसंख्येच्या एक तृतीयांश व्यक्ती 18 वर्षांखालील आहेत, तसेच 50 कोटींहून अधिक व्यक्तींनी अद्याप वयाची 25 वर्षे पूर्ण केलेली नाहीत. सुमारे 51 टक्के लोकसंख्या जननक्षम वयोगटातील असून, दरवर्षी लाखो व्यक्ती या गटात समाविष्ट होत आहेत आणि ही गोष्ट लोकसंख्यावाढीशी निगडित आहे.

लोकसंख्यावाढ रोखायची असेल, तर मृत्यूदर तसेच जन्मदर कमी होणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकांचे आरोग्य उत्तम राखण्याची म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याची आवश्यकता आहे. भारतात मृत्यूदर तसा खाली येऊन स्थिरावला आहे; परंतु जन्मदर अजूनही पुरेसा खाली आलेला नाही. जन्मदर कमी न होण्यामागे प्रामुख्याने कुटुंबनियोजन न करणे, कुटुंबनियोजन करण्याची इच्छा असूनही कुटुंबनियोजन साधने न मिळणे, मोठ्या कुटुंबाच्या अभिलाशेतून अधिक मुले जन्माला घालणे अशा अनेक बाबी कारणीभूत आहेत. सध्याच्या आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी 2.6 कोटी बालके जन्माला येतात. सुमारे 18.8 कोटी व्यक्तींना कुटुंबनियोजन साधने मिळण्याची गरज आहे. कुटुंबनियोजन साधने वापरणार्‍या जोडप्यांचे प्रमाण केवळ 55 टक्के आहे. ज्यांना आवश्यक आहे, अशा सर्वांपर्यंत कुटुंबनियोजनाची .

Similar questions