प्रश्न : पुढील मुद्दे वाचा आणि दिलेल्या प्रसंगाचे वर्णन करा :
घरी येणारे पाहुणे
अनोख्या पाहुण्यांचे आभार र
→ पक्ष्यांचे आगमन
आवडते पाहुणे
पक्षी निरीक्षणाचा आनंद
> पक्ष्यांची विविधता
Answers
Answer:
प्रश्न. पुढील मुद्दे वाचा आणि दिलेल्या प्रसंगाचे वर्णन करा : स्वादिष्ट प्रसाद आनंददायी वातावरण मुलींचे गोविंदापथक सणांचे दिवस मल्लखांब कसरती अशी साजरी केली दहीहंडी! शहरात जल्लोशाचे वातावरण कृष्णजन्म सोहळा आईबाबांना वैताग येणे दहीहंडीसाठी गावी जाणे
Explanation:
उत्तर:
आमचे घर बऱ्याच वेळा पाहुण्यांनी गजबजलेले असते. माझी मित्रमंडळी तर नेहमीच आमच्या घरी येत असतात. गप्पा-गोष्टी, खाणे-पिणे, थट्टा-मस्करी यांना तर नेहमीच ऊत येत असतो. पण या वेळेस एप्रिल-मेच्या सुरुवातीला आमच्या घरी अनोखे पाहणे आले होते.
आमच्या घराच्या गॅलरीत आईने रोपांच्या चार-पाच कुंड्या ठेवल्या होत्या. त्यांतील रोपट्यांवर रंगीबेरंगी फुलेही फुलत होती. एके दिवशी गॅलरीत पिवळ्या रंगाचा छोटासा पक्षी येऊन बसला. अंगावर पांढरे ठिपके असलेला चिकूच्या आकाराचा हा पक्षी पाहून मी तर आनंदाने उडीच मारली. त्यांच्यासाठी गॅलरीत पाणी आणि दाणे ठेवून मी दुसऱ्या दिवशी त्या पक्ष्याची वाट पाहिली. आणि काय आश्चर्य! आमचा पाहुणा आज जोडीने हजर झाला होता. आता तर दोन, तीन, चार अशी नव्या पाहुण्यांची भर पडू लागली. त्यांतील काही तुरेवाले पक्षी, तर काही लांब शेपटीवाले पक्षी, तर काही लांब चोचवाले. त्यांच्या रंगांचे वर्णन करायला शब्दच कमी पडतील एवढी रंगांची विविधता !
आमचे घर तळमजल्यावर आहे. आमच्या गॅलरीच्या समोर मोकळी जागा आहे. तिथे आता बऱ्याच पक्ष्यांची ये-जा सुरु झाली आहे. ते तेथे यावेत म्हणून मी त्यांना दाणेही घालत असते. आता तर तेथे वेगवेगळे पक्षी मला दिसू लागले आहेत
कावळे, चिमण्या, कबुतरे, पोपट हे तर नित्यनेमाने येणारे पक्षी। परंतु या नव्या पाहुण्यांमुळे माझे पक्षी निरी जोमाने सुरू झाले. त्यांतील काही पक्षी जोडीने येत होते, तर काही पक्षी छोट्या थव्याने येत होते. सकाळी बाजल्यापासून या पाहुण्यांची वर्दळ सुरू होत असे. त्यांचे पंख भिरभिरवणे, दाणे टिपणे, वेगवेगळे आवाज है अनुभवणे आनंददायी होते.
या पाहुण्यांकडे टक लावून पाहण्याची मला सवयच लागली. त्यांच्या हालचाली पाहण्यात मला आनंद मिळू लागल काही पक्षी माणसाप्रमाणे एक-एक पाऊल पुढे टाकत चालतात. चिमणी दोन्ही पाय एकदम उचलून उड्या मारतच चालते बहुतेक पक्षी तिरप्या रेषेत हळूहळू उंच जातात. चिमणी तर इतरांप्रमाणे तिरप्या रेषेत भुर्रकन वर जातेच, पण क्षणा गिरक्या घेते आणि पुन्हा जमिनीवर तिथेच येते. पक्षी घाबरू नयेत म्हणून मी निमूट उभी राहते. तरी ते काही पटकन जव आले नाहीत. प्रथम त्यांनी माझ्याकडे रोखून पाहिले. मीपण शांतच राहिले. तसे ते हळूहळू पुढे सरकले. मग मात्र ते माझ्या जवळपास बावरू लागले. लहान पक्षी एका जागी फार वेळ थांबत नाहीत. ते इकडेतिकडे भिरभिरत वावरतात. मोठे प मात्र शांतपणे वावरतात. लहान पक्षी जरासा संशय आला, तरी भुर्रकन उडतात. मोठे पक्षी मात्र सावधपणाने दूरच राहतात एकदा तर पहाटे शीळ घातल्याचा आवाज आला. मी धावतच गॅलरीत गेले आणि थबकले! कारण एक तुरेवाल
महाशय शीळ घालत होते. या मित्रामुळे माझी सकाळ संगीतमय होऊ लागली.. हे सगळे पाहुणे आमच्या आदरातिथ्याचा रोज आनंद घेत होते. त्यांची गमतीशीर हालचाल, किलबिलाट आण मनोहर रंग पाहून आम्हाला सगळ्यांना आनंद व्हायचा. आमच्या गॅलरीतील पाहुणे बनल्याबद्दल त्यांचे आभार कसे मानाव हे मात्र कळत नव्हते.