प्रश्न ४. पत्र लेखन : शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा .
Answers
Answer:
दिनांकः१९ जानेवारी,२०२२
प्रति,
माननीय व्यवस्थापक
आदर्श पुस्तकालय
दादर पश्चिम-४०००९५
विषयः शाळेतील ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करण्याबाबत.
माननीय महोदय,
आपणास कळवण्यात खूप आनंद होत आहे की आमच्या सरस्वती विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी भव्य अशा ग्रंथालयाची निर्मिती करण्यात येत आहे. पुस्तक हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील अविभाज्य भाग असतो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व क्षेत्रातील विविधांगी पुस्तकांचे संग्रह या ग्रंथालयात करण्याचे नियोजित आहे.
आमच्या शाळेतील ग्रंथालय सुसज्ज करण्यासाठी तुमच्याकडे उपलब्ध असणाऱ्या इतिहास, भूगोल, विज्ञान, मराठी साहित्य, इंग्रजी साहित्य, हिंदी साहित्य, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र अशा सर्व विषयातील प्रत्येकी १०० पुस्तकांची आमची मागणी आहे. पुस्तकांची यादी या पत्रासोबत आम्ही जोडत आहोत. जसाही पुस्तकांचा पुरवठा होईल तसे तुमचे पैसे पाठवण्यात येतील.
यादीतील सर्व पुस्तके कृपया वेळेतच पोहोचले पाहिजे याची खात्री करावी.
आपला विश्वासू,
अ.ब.क.,
ग्रंथपाल,
सरस्वती विद्यालय, कांदिवली.
Explanation:
Answer:
Here is your answer:
Explanation:
मागणी पत्र लेखन मराठी
दिनांक 10 फेब्रुवारी 2021.
कावेरी पुस्तकालय,
राणे चौक,
शनिवार पेठ,
गाळा नंबर 4,
पुणे 30.
विषय: ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणे बाबत.
महोदय,
मी दा.म.शास्त्री, म्हात्रे विद्यालय सातारा. शाळेचा ग्रंथालय प्रतिनिधी(ग्रंथपाल) मी आपणास शाळेच्या वतीने पुस्तकांची मागणी करणे बाबत पत्र पाठवत आहे. आजच्या दैनिक वर्तमानपत्रामध्ये आपल्या पुस्तकालयाची जाहिरात वाचली. आपली शिवजयंतीनिमित्त देण्यात आलेली खास सवलत प्रशंसनीय आहे. जाहिरातीमध्ये शिवजयंतीनिमित्त देण्यात आलेली पुस्तक खरेदी वरची खास सवलत पाहून आम्ही आपल्या पुस्तकालयातून काही पुस्तके खरेदी करू इच्छित आहोत. पत्रासोबत काही निवडक पुस्तकांची यादी पाठवत आहे. आशा आहे कि ही सर्व पुस्तके आपल्याकडे उपलब्ध असतील.
कळावे
आपला नम्र
दा. म. शास्त्री (ग्रंथपाल), म्हात्रे विद्यालय, सातारा 415508.
पुस्तकांची यादी
नाव नग लेखक
ययाती 10 वि स खांडेकर
तीन हजार टाके 10 सुधा मूर्ती
गुलामगिरी 10 ज्योतिराव फुले
झोंबी 10 आनंद यादव
मागणी पत्र लेखन मराठी
सवलत वजा करून येणारी एकूण देय रक्कम शाळेच्या अधिकृत फोन नंबर किंवा ईमेल वर कळविण्यात यावी. फोन नंबर 55009966 ई-मेल [email protected]