प्रश्न
*सर्वात प्रथम भारतामध्ये रुपया हे नाणे कोणी सुरू केले ?*
Answers
Answer:
मलतब
Explanation:
कुठेतरी जुना वाडा पाडताना वा खोदकाम करताना अचानक प्राचीन नाण्यांचा हंडा सापडला की लोक तो पाहण्यासाठी गर्दी करतात. इतिहासाचा अभ्यास करताना महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या साधनांमध्ये त्या- त्या काळातील नाण्यांचा समावेश होतो. आर्थिक विनिमय, व्यापार- उदीम, सुबत्ता, अवनती, तंत्रज्ञानात्मक प्रगती, राजकीय यंत्रणा, तत्त्वज्ञान, धार्मिक कल्पना, कलाकुसर इत्यादी कितीतरी पैलूंविषयी ऐतिहासिक नाणी बोलू शकतात. नाण्यांमुळे राजांची नावे, त्यांची क्रमवारी, त्यांचा काळ, राज्यांची स्थाने, त्यांच्या सीमा समजण्यास मदत होते. नाण्याचे वजन, आकार, प्रकार, धातू, नाण्यावरील मजकूर, चित्रे, चिन्हे, नाण्याचे दर्शनी मूल्य, त्याची टांकसाळ या साऱ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात.
भारतीय नाण्यांचा जन्म इ. स. पूर्व ६ व्या शतकात मानला गेला आहे. ‘आहत’(Punch Marked Coins) ही सर्वात जुनी भारतीय नाणी. २६०० वर्षांची अखंडित परंपरा भारतीय नाण्यांना लाभली आहे. आदिमानवाच्या काळात चलन नव्हते. त्याची गरजच नव्हती. पण काही प्रमाणात वस्तुविनिमय होता. साधारणत: नवाश्म युगाच्या काळात पशूंना खरेदी-विक्रीतील माध्यम मानले गेले. मुख्यत: गाय हे विनिमय माध्यम होते. गाईप्रमाणे धान्य, नारळ, तंबाखू, चाकू-सुरे, मणी, शंख-शिंपले हेसुद्धा विनिमय माध्यम म्हणून वापरले जात होते. पण धान्य आणि गाय हे विनिमय म्हणून वापरताना समस्या होत्याच. उदा. दोन किलो धान्यासाठी एक गाय असेल; तर एक किलो धान्यासाठी अर्धी गाय देणे-घेणे शक्य नव्हते. त्यात धान्य नाशिवंत असल्याने टिकाऊ धातूंचा वापर सुरू झाला. धातूची कडी, अंगठय़ा, गोळे, दागिने इत्यादी वापरले जाऊ लागले. कालांतराने विशिष्ट आकाराच्या, वजनाच्या धातूच्या तुकडय़ांवर त्यातील वजन, शुद्धता, मूल्य यांची खात्री देणारी चिन्हं उमटवली गेली. पुढे हे चिन्ह उमटवलेले धातूंचे तुकडे तो- तो राजाच पाडू लागला. त्यांनाच ‘नाणी’ म्हणतात.
भारतीय नाणी पाहताना असंख्य सत्ता व त्यांचा काळ यांचा मोठा इतिहास उभा राहतो. स्वातंत्र्यापर्यंत भारतात एकछत्री अंमल कधीही नव्हता. औरंगजेबाच्या वेळी मोगल साम्राज्य खिळखिळे झाले होते. मात्र, त्याने सुरू केलेली नाणी त्याच्या पश्चात १८५७ पर्यंत देशभर चालत होती. अकबरापासून शेवटचा बादशहा बहादूरशहा जफपर्यंत घोषित, स्वयंघोषित असे २५ मोगल बादशहा होऊन गेले. त्यातील बहुतेकाने नाणी काढली होती. त्यावेळी हिंदुस्थानात सुमारे २०० ठिकाणी मोगलांच्या टांकसाळी होत्या. इंग्रजांची भारतात सत्ता होती, पण केवळ एक-तृतियांश सत्ता ते थेट राबवत होते. तर दोन-तृतियांश सत्ता वेगवेगळ्या राजवटी इंग्रज छत्राखाली राबवीत होत्या. त्यामुळेच भारतीय नाण्यांत विविधता आढळते.
२६०० वर्षांपूर्वी भारतात काशी, मगध, गांधार, पांचाल, कलिंग आदी राजवटींनी सर्वप्रथम नाणी पाडली. आहत किंवा Punch Marked Coins या नावाने ओळखली जाणारी ही नाणी चौकोनी, गोल, लंबगोल अशा विविध आकारांत प्रामुख्याने चांदीत बनवलेली होती. ती ओबडधोबड होती, पण सारख्या वजनाची होती. अशी नाणी पश्चिम बंगालमधील सुंदरबनपासून काबूलपर्यंत तसेच दक्षिणेला कोईमतूपर्यंत सापडली आहेत. त्यात ३०० विविध प्रकार आढळून आले आहेत. त्यावर मनुष्याकृती, पशू-पक्षी, हत्यारे, झाडे ते चंद्र-सूर्यापर्यंतची चिन्हे, चित्रे अंकित आहेत. इ. स. पूर्व ४ थ्या आणि ३ ऱ्या शतकात मौर्याची सत्ता असताना त्यांनी चांदीबरोबरच तांब्याचीही नाणी पाच चिन्हे अंकित करून सुरू केली. त्यांनी ठसे ठोकून नाणी पाडण्याऐवजी साच्यात धातूचा रस ओतून ती पाडण्यास सुरुवात केली. सर्वात जुनी ओतीवकामाची चौकोनी आणि गोल नाणी इ. स. पूर्व ४ थ्या शतकातील सम्राट अशोकाच्या काळातील तक्षशिला येथे सापडली. त्यावर बुद्ध, बोधीवृक्ष, स्वस्तिक अशी नाण्याच्या एकाच बाजूला चिन्हे आहेत. दोन साचे वापरून नाण्याच्या दोन्ही बाजूंना चिन्हे उमटविण्यास पांचालांनी सुरुवात केली. गांधारांनी त्यात सुबकता आणली. इंडोग्रीकांनी चिन्हांच्या जोडीने लिपी व अक्षरांचा नाण्यांवर पहिल्यांदा वापर सुरू केला. जवळपास ३९ इंडोग्रीक राजांनी व दोन राण्यांनी उत्तर-पश्चिम भारतावर राज्य केले. तर इ. स.च्या पहिल्या शतकात कुशाणांनी चांदी आणि तांब्याबरोबर सोन्याचे पहिले नाणे काढले. हे कुशाण मूळचे चीनच्या सरहद्दीवरील भागातले. त्यांना तेथून हुणांनी हुसकावून लावले. कुशाणांपाठोपाठ शक आणि पालव आले. पण कुशाणांनी शक आणि पालवांचा पराभव करून ते अफगाणिस्तान आणि काश्मीरला स्थायिक झाले. कुशाणांनी नाण्यांवर संस्कृत भाषेचा वापर केला. तर इसवी सनाच्या तिसऱ्या शतकातील कौसंबी, अयोध्या, मथुरा इथल्या नाण्यांवर राजांची नावे ब्रह्मी लिपीत आहेत. याच काळात गुप्तांनी काढलेल्या सोन्याच्या नाण्यांत अचूकता आणि विविधता आढळते. चंद्रगुप्ताने काढलेल्या नाण्यांवर त्यांच्यासह राणी कुमारीदेवी दिसून येते. समुद्रगुप्ताच्या नाण्यांवर अश्वमेध, हातात कुऱ्हाड, शिकार करताना वीणावाद्य घेतलेली अशा विविध मुद्रा पाहावयास मिळतात. क्षत्रपांची नाणीही प्राचीन. हे क्षत्रप मूळचे पर्शियातले. पश्चिम भारतात इ.स. पूर्व पहिल्या शतकापासून इसवी सनाच्या चौथ्या शतकाच्या शेवटपर्यंत क्षत्रपांची सत्ता होती. दक्षिणेला पांडय़ा, चोला, चेरा घराणी राज्य करीत होती. मौर्य घराणं अस्ताला जात असतानाच दक्षिणेत सातवाहन घराणं उदयाला येत होतं. त्यांनी इ. स. पूर्व २२५ ते इ. स. २२५ असे ४५० वर्षे राज्य केले. सातवाहनांनी चांदी आणि तांब्याबरोबरच शिशाचीही नाणी काढली. इ. स.च्या ८ व्या शतकात दक्षिणेत बदामीचे चालुक्य, कांचीचे पालाज राज्य करीत होते. चालुक्यांना बाजूला करून राष्ट्रकुट आले. ९ व्या शतकात मध्य भारतात गुर्जर, प्रतिहार, उत्तरेला चंडेला, सोळंकी, चौहान ही राजपूत घराणी सत्तेत आली. पृथ्वीराज चौहानचा पराभव करणारा महंमद घोरी इ. स. १२०६ मध्ये निधन पावल्यावर सत्ता कुतुबुद्दीन ऐबककडे आली. त्यानंतर १८५७ पर्यंत जवळपास ६५० वर्षे दिल्लीच्या तख्तावर मुस्लीम राज्यकर्तेच होते.